अन्नू मलिकने तयार केलेल्या गाण्याला या सिनेमात मिळाली जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 02:40 PM2018-09-07T14:40:09+5:302018-09-07T14:55:20+5:30
अन्नू मलिक संगीत क्षेत्रात महान संगीतकार म्हणून ओळखला जातो. प्रेक्षकांसाठी आणि पाहुणे कलाकारांसाठी भन्नाट शायरी बनवण्याचा आणि सादर करण्याचा करण्याचा त्याचा स्वभाव, इंडियन आयडॉल 10 हा सर्वात मोठा संगीत रियालिटी शो लोकप्रिय होण्यामागील एक मोठे कारण देखील आहे.
अन्नू मलिक संगीत क्षेत्रात महान संगीतकार म्हणून ओळखला जातो. प्रेक्षकांसाठी आणि पाहुणे कलाकारांसाठी भन्नाट शायरी बनवण्याचा आणि सादर करण्याचा करण्याचा त्याचा स्वभाव, इंडियन आयडॉल 10 हा सर्वात मोठा संगीत रियालिटी शो लोकप्रिय होण्यामागील एक मोठे कारण देखील आहे. अलीकडेच एका भागात वरुण धवन आणि अनुष्का शर्मा आपल्या सुई धागा या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थित झाले होते. योगायोग म्हणजे या बॉलीवूड चित्रपटाच्या शीर्षक गीतास अन्नू मलिकने संगीत दिले आहे.
इंडियन आयडॉलमधील सर्व सर्वोत्तम 11 स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचा अनुष्का शर्मा आणि वरुण धवनने मनापासून आनंद घेतला. वरुण धवनने तर स्पर्धक आणि परीक्षकांसोबत नृत्य देखील केले त्यामुळे कार्यक्रमाचे ग्लॅमर आणि रंजकता अधिकच वाढली. महान संगीतकार अन्नू मलिकने त्याच क्षणी ‘सब बढिया’ हे नवीन गीत तयार केले! वरुण आणि अनुष्कासाहित नेहा कक्कड आणि विशाल दादलानी देखील ते सुमधुर गीत ऐकून अवाक झाले. दोघा पाहुण्या कलाकारांना तर हे गीत इतके आवडले की, त्यांनी त्याच क्षणी ठरवून टाकले की हे गीत ते आपल्या ‘सुई धागा’ चित्रपटात सामील करतील.
इंडियन आयडॉल 10 च्या सेट्सवर अन्नू मलिकने सांगितले की, “अनुष्का आणि वरुण आमच्या कार्यक्रमात आले, हा आमच्यासाठी खूप अद्भुत क्षण होता. सुई धागा एक विशेष चित्रपट आहे आणि इंडियन आयडॉलमधील ती वेळच अद्भुत होती. एक संगीतकार म्हणून आसपासच्या गोष्टी पाहून गाणे स्फुरणे हे माझ्याबाबतीत स्वाभाविकपणे होते. आसपासचे वातावरण पाहून ‘सब बढिया’ हे गीत मला स्फुरले. सर्वांना ते आवडले आणि आश्चर्य देखील वाटले. वरुण आणि अनुष्का यांना तर हे गीत इतके आवडले की, त्यांनी चित्रपट पूर्ण झालेला असून देखील ते गीत आपल्या ‘सुई धागा’ चित्रपटात सामील करण्याचे ठरवून टाकले. आम्हा सर्वांसाठी तो एक अभिमानाचा क्षण होता की इंडियन आयडॉलच्या सेटवर बनवलेले माझे गीत आता आगामी बॉलीवूड चित्रपटात सामील होणार आहे.”