अचानक होतेय दुबईत अडकून पडलेल्या सोनू निगमच्या अटकेची मागणी, वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 04:36 PM2020-04-21T16:36:47+5:302020-04-21T16:39:50+5:30

होय, तूर्तास सोनू नावाचे वादळ सोशल मीडियावर वादळ घोंघावत आहे. 

sonu nigam faces backlash for his old hate tweets people ask dubai police to arrest him-ram | अचानक होतेय दुबईत अडकून पडलेल्या सोनू निगमच्या अटकेची मागणी, वाचा काय आहे कारण

अचानक होतेय दुबईत अडकून पडलेल्या सोनू निगमच्या अटकेची मागणी, वाचा काय आहे कारण

googlenewsNext
ठळक मुद्देएप्रिल 2017 मध्ये सोनू निगमने एक ट्विट केले होते.

बॉलिवूड सिंगर सोनू निगम लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडला आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द सोनू याची माहिती दिली होती. पण तूर्तास सोनू  नावाचे वादळ सोशल मीडियावर घोंघावत आहे. होय, याचे कारण काय तर सोनूने तीन वर्षांपूर्वी केलेले एक ट्विट. होय, या जुन्या ट्विटच्या वादामुळे अनेक युजर्सनी दुबई पोलिसांकडे सोनूच्या अटकेची मागणी केली आहे.

तीन वर्षांपूर्वी सोनू ने भारतातील अजानबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते. त्याच्या या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता तीन वर्षांनंतर त्याच्या या ट्विटचे स्क्रिनशॉट  सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि यावरून सोनूला अटक करण्याची मागणी होत आहे.

 ‘सोनू निगमला भारतात अजानमुळे झोप येत नव्हती. आता तो दुबईत आहे तर दुबई पोलिसांनीच त्याच्या या समस्येचे समाधान करावे. आता दुबईत त्याला अजानच्या आवाजाने त्रास होत नाहीये का?’ अशा अनेक प्रतिक्रिया नेटक-यांनी यावर दिल्या आहेत. सोनूविरोधात अटकेची मागणीही होऊ लागली आहे. अद्याप दुबई पोलिसांनी यावर कुठलेही वक्तव्य केलेले नाही.

काय आहे ट्विटचे प्रकरण
एप्रिल 2017 मध्ये सोनू निगमने एक ट्विट केले होते. ‘देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणा-या या धार्मिक रुढी कधी थांबणार? असे तो म्हणाला होता. त्याच्या या ट्विटनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या संपूर्ण वादावर सोनूने पत्रपरिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. कोणत्यांही धर्माची निंदा करण्याचाही माझा हेतू नव्हता. मुळात माझा विरोध लाऊडस्पीकरला आणि त्यामुळे होणा-या मोठा आवाजाला आहे, असे स्पष्टीकरण त्याने दिले होते.

Web Title: sonu nigam faces backlash for his old hate tweets people ask dubai police to arrest him-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.