CoronaVirus : यांना सलाम! सोनू निगमने देऊ केला मुंबईतील आपला बंगला, भूषणकुमारने दिले 11 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 02:30 PM2020-03-29T14:30:59+5:302020-03-29T14:34:30+5:30
बॉलिवूडमधून मदतीचा ओघ सुुरू...
कोरोनामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे़ भारतातही कोरानाचा कहर आहे. अशा संकटसमयी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. बॉलिवूड स्टार्सही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अक्षय कुमारने कोरोनाशी लढण्यासाठी 25 कोटींची मदत दिली आहे. कपिल शर्माने 1 कोटींची, हृतिक रोशनने 50 लाखांची मदत जाहीर केली आहे. आता बॉलिवूडचा सगळ्यांचा आवडता सिंगर सोनू निगम यानेही कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. अर्थात पैशाच्या रूपात नाही तर एका वेगळ्या पद्धतीने.
होय, सोनू निगम सध्या दुबईत राहतोय. पण कोरोनाचा वाढता धोका बघता, आता त्याने व त्याच्या वडिलांनी त्यांचा मुंबईतील मड आयलँडमधील बंगला कोरोना रूग्ण व त्यांची देखभाल करणा-या आरोग्य कर्मचा-यांसाठी उघडा करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘हा संपूर्ण जगासाठी कसोटीचा काळ आहे. अशात सर्वांनी जमेल तशी भारत सरकारची मदत करायला हवी. कुणावर खाली घर, बंगला असेल तर त्याचा वापर भारत सरकारच्या मदतीसाठी करता येईल,’ असे त्याने म्हटले आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप बघून भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी आणली. तेव्हा सोनू निगम दुबईत होता. अशाही स्थितीत सोनू भारतात परतू शकला असता. पण अशावेळी भारतात परतून भारतीय आरोग्य व्यवस्थेवर तो ओझं बनू इच्छित नव्हता. त्यामुळे त्याने दुबईत राहण्याचाच निर्णय घेतला. सध्या तो त्याच्या कुटुंबासोबत सेल्फ आयसोलेशनमध्ये दुबईत आहे.
भूषण कुमारने दिलेत11 कोटी
Today, we are all at a really crucial stage & it’s extremely important to do all we can to help. I, along with my entire @TSeries family pledge to donate Rs. 11 crores to the PM-CARES Fund. We can & will fight this together, Jai Hind 🇮🇳@PMOIndia@narendramodi#IndiaFightsCoronahttps://t.co/mBBhuVgW1t
— Bhushan Kumar (@itsBhushanKumar) March 29, 2020
कोरोनाशी लढण्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स मदतीसाठी समोर येत आहेत. आता म्युझिक कंपनी टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांनी पीएम रिलीफ फंडात 11 कोटी रूपये देण्याची जाहीर केले आहे.