निवडणूक लढणार का? पंतप्रधान बनणार का? सोनू सूदच्या उत्तराने जिंकली मने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:30 PM2021-05-11T20:30:51+5:302021-05-11T20:31:07+5:30

अनेक लोक सोनू सूद पंतप्रधान बनावा, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. खुद्द सोनूचे काय मत आहे?

sonu sood finally reacts on reports about running for post of prime minister | निवडणूक लढणार का? पंतप्रधान बनणार का? सोनू सूदच्या उत्तराने जिंकली मने

निवडणूक लढणार का? पंतप्रधान बनणार का? सोनू सूदच्या उत्तराने जिंकली मने

googlenewsNext
ठळक मुद्देलवकरच चार ऑक्सिजन प्लान्ट लावण्याची त्याची योजना आहे. कोरोनाकाळात ऑक्सिजनचा तुटवडा सहन करत असणा-या चार राज्यांत हे प्लान्ट उभारले जाणार आहेत.

कोरोना काळातील सोनू सूदचे (Sonu Sood) काम पाहून सध्या जो तो त्याला पंतप्रधान बनण्याची मागणी करतोय. आजच राखी सावंतने सोनू पंतप्रधान व्हायला हवा, अशी जाहिर इच्छा व्यक्त केली. त्याआधी अभिनेता वीर दास यानेही सोनूला पंतप्रधान बनवाला हवा, असे म्हणाला होता. अगदी सोशल मीडियावरही अनेक लोक तो पंतप्रधान बनावा, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. (Sonu Sood Prime Minister) खुद्द सोनूचे काय मत आहे? आता त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्याच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओत सोनू त्याच्या घराबाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सला ज्यूसचे वाटप करताना दिसतोय. यादरम्यान पापाराझी सोनूला पंतप्रधान बनण्यावर प्रतिक्रिया विचारतात. सोनूजी, सगळे तुम्हाला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात? तुम्ही निवडणूक लढणार का? असा प्रश्न त्याला करतात. यावर सोनू अगदी नम्रपणे उत्तर देतो.

‘जो जहां वहीं सही है, आम इंसान ही बेहतर हूं. आप लोगों के साथ तो खडा हूं...,’ असे तो म्हणतो.
कोरोना काळात सोनू सूद रस्त्यावर उतरून लोकांना मदत करतोय. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा त्याने हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले. त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. लाट ओसरली तरीही त्याच्या मदतीचा ओघ सुरू राहिला. लोकांना रोजगार देण्यापासून तर त्यांच्या शिक्षणाचा भार उचलण्यापर्यंत, उपचारासाठी मदत करण्यापर्यंत अनेक गोष्टी त्याने केल्या. कोरोनाच्या दुस-या लाटेदरम्यान सोनू लोकांसाठी दिवसरात्र खपतोय. देशात ऑक्सिजन, आयसीयू बेड्सचा प्रचंड तुटवडा आहे. अशास्थितीत एक एक प्राण वाचवण्यासाठी सोनू दिवरात्र एक करतोय. लवकरच चार ऑक्सिजन प्लान्ट लावण्याची त्याची योजना आहे. कोरोनाकाळात ऑक्सिजनचा तुटवडा सहन करत असणा-या चार राज्यांत हे प्लान्ट उभारले जाणार आहेत. यात महाराष्ट्रासह दिल्लीचा समावेश आहे.

Web Title: sonu sood finally reacts on reports about running for post of prime minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.