सोनू सूदने पहिल्यांदाच सांगितलं कंगना रणौतचा 'मणिकर्णिका' सोडण्याचं कारण, म्हणाला -
By अमित इंगोले | Published: September 22, 2020 09:30 AM2020-09-22T09:30:17+5:302020-09-22T09:39:01+5:30
आधी 'मणिकर्णिका' सिनेमात अभिनेता सोनू सूद महत्वाची भूमिका साकारणार होता. पण मधेच त्याने सिनेमा सोडला.
कंगना रणौतचा 'मणिकर्णिका' सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला होता. कंगना आणि सिनेमाचा दिग्दर्शक कृष यांच्यातील वादानंतर हा सिनेमा अधिक चर्चेत आला होता. अनेक वाद-विवादानंतर कंगनाने स्वत: सिनेमा दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. आधी या सिनेमात अभिनेता सोनू सूद महत्वाची भूमिका साकारणार होता. पण मधेच त्याने सिनेमा सोडला. आता या सिनेमाबाबत त्याने बातचीत केली आहे. सोनूने सांगितले की, हा निर्णय त्याने फार जड मनाने घेतला होता.
पत्रकार बरखा दत्त यांनी घेतलेल्या मुलाखतीत सोनूला विचारण्यात आले की, बरचसं शूटींग झाल्यावरही त्याने हा सिनेमा मधे का सोडला? यावर सोनू म्हणाला की, कंगना चांगली मैत्रीण आहे आणि तिच्या भावना त्याला दुखवायच्या नव्हत्या. सोनूने सांगितले की, कंगनाला सिनेमा दिग्दर्शित करताना त्याची मदत हवी होती. त्यासाठी तो तयारही झाला होता. पण सोनूने जेव्हा त्याचे सीन्स पाहिले तर ते ८० टक्के कापले गेले होते. यावर कंगनाने उत्तर दिलं होतं की, ते सीन तिला पुन्हा शूट करायचे आहेत.
सोनूने सांगितले की, मी तिला म्हणालो होतो की, तू माझी चांगली मैत्रीण आहेस. पण तू जे म्हणत आहेस ते करण्यात मी कम्फर्टेबल नाही. मी जुनी स्क्रीप्ट आणि दिग्दर्शकाला हो म्हणालो होतो. पण नंतर मी या प्रोजेक्टमधून बाहेर पडणं योग्य समजलो. मी याबाबत काही बोललो सुद्धा नाही. मी सिनेमासाठी ४ महिने दिले होते आणि यासाठी मला काही चांगले प्रोजेक्ट्स सोडवेही लागले होते. मला फार दु:खं झालं होतं पण मी काही बोललो नाही.
सोनूने जेव्हा सिनेमा सोडला तेव्हा कंगनाने आरोप केला होता की, सोनूला महिला डिरेक्टरच्या हाताखाली काम करायचं नव्हतं. यावर सोनू म्हणाला की, त्याला महिला डिरेक्टरची काहीही अडचण नव्हती. कारण त्याने फराह खानसोबत आधीच काम केलेलं होतं.
हे पण वाचा :
सोनू सूदने नाव न घेता साधला कंगना रणौतवर निशाणा? ट्विट व्हायरल....
भावोजींनी शेअर केलेत सुशांतसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट, या विषयावर व्हायची चर्चा
सोनू सूदचा नाव न घेता कंगनावर पुन्हा निशाणा, म्हणाला - 'सुशांत जिवंत असता तर...'