Sonu Sood News : सोनू सूदने २ दुकाने आणि ६ फ्लॅट्स गहाण ठेवून घेतलं १० कोटी रूपयांचं लोन?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 09:44 AM2020-12-09T09:44:48+5:302020-12-09T11:49:14+5:30
Sonu Sood took loan of 10 crore and mortgages his shops and flats property : सोनू सूद सतत ट्विटरवर अॅक्टिव आहे आणि गरजू लोकांची मदत करत आहे. प्रवासी मजुरांना सुरू झालेला हा मदतीचा सिलसिला आता प्रत्येक गरजूसाठी फायदेशीर ठरतो आहे.
लॉकडाऊन लागल्यापासून ते आतापर्यंत बॉलिवूड अभिनेता सोनू सूद Sonu Sood सतत कोरोनाने प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊन दरम्यान त्याने अनेकांना जेवण, पैसे दिले. अनेकांना त्यांच्या गावी पोहोचवलं तर अनेकांना मेडिकल हेल्प केली. सोनू सूद कोरोना काळात प्रवासी मजुरांसाठी देवदूत ठरला. आता ताज्या रिपोर्टनुसार, सोनू आणखी काही चांगली कामे करणार आहे. अशी माहिती आहे की, तो त्याच्या ८ प्रॉपर्टीज गहाण ठेवून १० कोटी रूपयांचं लोन घेणार आहे.
मनीकंट्रोल.कॉमच्या रिपोर्टनुसार, सोनूने त्याची दोन दुकाने आणि ६ फ्लॅट्स गहाण ठेवले आहेत. या प्रॉपर्टीजचा मालक सोनू आणि त्याची पत्नी सोनाली आहे. मात्र, सोनू सूदकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही. तसेच याचा वापर तो कशासाठी करणार हेही समजू शकलेलं नाही.
सोनू सूद सतत ट्विटरवर अॅक्टिव आहे आणि गरजू लोकांची मदत करत आहे. प्रवासी मजुरांना सुरू झालेला हा मदतीचा सिलसिला आता प्रत्येक गरजूसाठी फायदेशीर ठरतो आहे. त्याला मदतीसाठी रोज हजारो मेसेजेस येतात आणि यातील शक्य त्या लोकांना तो मदत करत असतो. इतकेच नाही तर त्याने एक हेल्पलाइन नंबरही जारी केला आहे. याआधी त्याने पंजाबच्या पॅरामेडिकल स्टाफला १५०० पीपीई किट आणि पोलिसांना २५ हजार फेस शील्ड्स दिले आहेत.
अनेकांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्याने अॅपही सुरू केलं आहे. तर ज्यांचा कोरोना काळात रोजगार गेला त्यांना आर्थिक मदतही करत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना त्याने जमेल ती मदत केली आहे आणि करतो आहे. सोबतच त्याने वेगवेगळ्या सिनेमांच्या शूटींगलाही सुरूवात केली आहे.