फोन नंबर याद है ना दोस्तों...? बहिण मालविकाच्या पराभवानंतर सोनू सूदचं पहिलं ट्विट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 10:57 AM2022-03-13T10:57:38+5:302022-03-13T10:58:08+5:30

Sonu Sood Tweet : सोनू सूदची बहीण मालविका यांना पराभवाचा धक्का...., भाऊ म्हणाला...

sonu sood tweeted after sister malvika loss in moga district punjab assembly polls | फोन नंबर याद है ना दोस्तों...? बहिण मालविकाच्या पराभवानंतर सोनू सूदचं पहिलं ट्विट 

फोन नंबर याद है ना दोस्तों...? बहिण मालविकाच्या पराभवानंतर सोनू सूदचं पहिलं ट्विट 

googlenewsNext

कोरोना काळात लोकांसाठी दिवसरात्र खपणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याची बहिण मालविका  (Malvika) सूद पंजाबातून काँग्रेस तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. पंजाबच्या मोगा विधानसभा मतदारसंघातून (Punjab Assembly Polls) काँग्रेसने तिला उमेदवारी जाहिर केली होती. पण ‘आप’च्या उमेदवार अमनदीप कौर अरोरा यांच्यापुढे मालविकाचा निभाव लागला नाही.  20 हजारांहून अधिक मतांनी अमनदीप यांनी सोनू सूदची बहीण मालविकाचा निवडणूक रिंगणात पराभव केला. बहिणीच्या पराभवानंतर सोनू सूदने पहिलं  ट्विट केलं आहे. 
 ‘मी आणि मालविका आम्ही आयुष्यभर तुमच्या सेवेसाठी तत्पर असू...,’असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं आहे. शिवाय या फोटोसोबत एक कविताही शेअर केली आहे.

‘खिलाफ कितने हैं ये जरूरी नहीं... साथ कितने हैं ये जरूरी है...मदद करने के लिए तो सिर्फ जज्बा चाहिए... जो कल भी था आज भी है और आगे भी रहेगा... फोन नंबर याद है ना दोस्तों...,’ असं यात लिहिलं आहे.


  
 सोनूचं हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. सोनू सूदच्या या ट्विटवर अनेक लोक कमेंट्स करून त्याचं कौतुक करत आहेत. 
 सर तुम्ही नेहमी आमच्या हृदयात आहात, असं एका युजरने लिहिलं आहे. काँग्रेस नाही, तुमच्या बहिणीने ‘आप’मध्ये प्रवेश करायला हवा होता, अशा सल्ला एका युजरने यानिमित्ताने एका युजरने दिला आहे. विजय आणि पराभव हे दोन पैलू आहेत, तुम्ही लोकांचं मन जिंकलं आहे, अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे.

कोरोना काळात अभिनेता सोनू सूद लोकांसाठी ‘मसिहा’ बनला होता.   देशात कोरोनाकाळात लोक मदतीसाठी सैरावैरा भटकत असताना अशा लोकांसाठी अभिनेता सोनू सूद अगदी देवदूतासारखा धावून आला होता. यानंतर काही राजकीय पक्षांकडून सोनू सूदला निवडणूक लढवण्याची आॅफर देण्यात आली होती. पण सोनूने ती नाकारली होती. त्याच्याऐवजी त्याच्या बहिणीने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: sonu sood tweeted after sister malvika loss in moga district punjab assembly polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.