#संस्कारी जेम्स बाँड: ट्विटरकरांनी उडवली सेन्सॉर बोर्डाची खिल्ली

By Admin | Published: November 18, 2015 07:41 PM2015-11-18T19:41:29+5:302015-11-18T21:00:38+5:30

स्पेक्टर या आगामी जेम्स बाँड चित्रपटातील किसींग सीन्स व शिवराळ भाषेला कात्री लावल्याने ट्विटरवरून 'संस्कारी जेम्स बाँड' ट्रेंडद्वारे सेन्सॉर बोर्डाची खिल्ली उडवण्यात आली आहे.

#Sormark James Bond: Twitter scandal stirs up censor board | #संस्कारी जेम्स बाँड: ट्विटरकरांनी उडवली सेन्सॉर बोर्डाची खिल्ली

#संस्कारी जेम्स बाँड: ट्विटरकरांनी उडवली सेन्सॉर बोर्डाची खिल्ली

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - वेगवान, थरार आणि सस्पेन्समुळे अतिशय लोकप्रिय ठरणा-या जेम्स बाँड पटातील पुढील चित्रपट 'स्पेक्टर' हा लवकरच प्रदर्शित होणार असून डॅनिअल क्रेगची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट पाहण्यासाठी रसिक खूप उत्सुक आहेत. मात्र भारतात हा चित्रपट येण्यापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील किसींग सिन्स व शिवराळ भाषेला कात्री लावत या चित्रपटाला U/A असे सर्टिफिकेट दिले आहे. सस्पेन्स थ्रिलर अशा या चित्रपटाची जान असलेली रांगडी भाषा आणि प्रणयदृष्येच कापून टाकल्याने ट्विटरकर चांगलेच निराश झाले असून 'संस्कारी जेम्स बाँड' हा हॅशटॅग ट्रेन्डमध्ये आणून त्या माध्यमातून सेन्सॉर बोर्डाची चांगलीच खिल्ली उडवली आहे. 
 
#संस्कारीजेम्सबाँड'मधील काही मजेदार ट्विट्स :
 
Still 14 @Etardoh - 'संस्कारी जेम्स बाँड' शत्रूंच्या एजंटना मंगळवार, गुरूवार आणि नवरात्री दरम्यान मारत नाही.
 
Roflindian 2.0 @Roflindian -  'संस्कारी जेम्स बाँड' त्याच्यासोबत नेहमीच राखी घेऊन फिरत असल्यामुळे कोणीही त्याच्याशी पंगा घेत नाही. बाँडच्या रुपात असलेल्या आलोकनाथ यांना '00ॐ'  म्हटले जाईल.
 
Gappistan Radio ‏@GappistanRadio - जेम्स बाँडची नवी गॅजेट्स - उदबत्तीचे पॅकेट, धूपाचा डबा आणि अनुप जलोटा यांची सीडी..
 
Atul Khatri @one_by_two -  'संस्कारी जेम्स बाँड' च्या अॅस्टन मार्टिनच्या डॅशबोर्डवर गणपतीची प्रतिमा आहे.
 
tereotypewriter ‏@babumoshoy - M: जेम्स, क्या तुम मुझे सुन सकते हो? 
JB: सॉरी, लाइन क्लियर नहीं है।
M: जोर से बोलो...
JB: जय माता दी!

Web Title: #Sormark James Bond: Twitter scandal stirs up censor board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.