'पुष्पा २' नंतर 'गेम चेंजर' सिनेमाच्या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या २ चाहत्यांचा मृत्यू, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:00 IST2025-01-06T15:59:24+5:302025-01-06T16:00:08+5:30
अल्लू अर्जूननंतर आता सुपरस्टार राम चरणच्या दोन चाहत्यांचा मृत्यू झाला आहे.

'पुष्पा २' नंतर 'गेम चेंजर' सिनेमाच्या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या २ चाहत्यांचा मृत्यू, काय घडलं?
सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा २' सिनेमाच्या प्रीमिअरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या ९ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणात मोठा गदारोळ झाला होता. अल्लू अर्जूनला पोलिसांनी अटकही केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. अल्लू अर्जूननंतर आता सुपरस्टार राम चरणच्या दोन चाहत्यांचा मृत्यू झाला आहे.
राम चरणच्या 'गेम चेंजर' चित्रपटाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. येत्या १० जानेवरी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम (राजमुंदरी) येथे सिनेमाचा प्री-रिलीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनसमुदायही या कार्यक्रमाला उपस्थित होता.
या कार्यक्रमात अरावा मणिकांता आणि थोकदा चरण हे दोघे सहभागी झाले होते. कार्यक्रम आटोपल्यावर घरी परतत असताना दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. दोघे दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हॅनने त्यांना धडक दिली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पवन कल्याण यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. जनसेना पक्षाच्या वतीने पीडितांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
ఏడీబీ రోడ్డుపై ప్రమాదంలో యువకుల మృతి బాధాకరం
— Pawan Kalyan (@PawanKalyan) January 6, 2025
కాకినాడ – రాజమహేంద్రవరం నగరాల మధ్య ఉన్న ఏడీబీ రోడ్డు ఛిద్రమైపోయింది. గత అయిదేళ్ళల్లో ఈ రోడ్డు గురించి పట్టించుకోలేదు. పాడైపోయిన ఈ రోడ్డును బాగు చేస్తున్నారు. ఈ దశలో ఏడీబీ రోడ్డుపై చోటు చేసుకున్నా ప్రమాదంలో ఇద్దరు యువకులు దుర్మరణం…
दरम्यान, 'गेम चेंजर' हा दिग्गज चित्रपट निर्माता एस शंकर दिग्दर्शित आगामी राजकीय ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिली आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीसह राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. भ्रष्ट राजकीय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी लढा देणारा एक IAS अधिकारी राम चरण यांच्या व्यक्तिरेखेवर कथानक केंद्रित आहे.