३२ वर्षीय अभिनेत्रीने श्रीमंत मैत्रिणीच्या घरी मारला डल्ला, चोरी केलं १ किलो सोनं, झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 08:09 PM2024-03-05T20:09:05+5:302024-03-05T20:09:29+5:30

या अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली असून सध्या चौकशी करत आहेत.

32-year-old actress assaulted rich friend's house, stole 1 kg of gold, got arrested | ३२ वर्षीय अभिनेत्रीने श्रीमंत मैत्रिणीच्या घरी मारला डल्ला, चोरी केलं १ किलो सोनं, झाली अटक

३२ वर्षीय अभिनेत्रीने श्रीमंत मैत्रिणीच्या घरी मारला डल्ला, चोरी केलं १ किलो सोनं, झाली अटक

अभिनेत्री सौम्या शेट्टी (Saumya Shetty) हिच्यावर भारतीय टपाल विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्याकडे झालेल्या सोन्याच्या चोरीचा आरोप आहे. तिने आपल्याच मैत्रिणीच्या घरी चोरी केली आहे. मात्र, वेळीच पोलिसांनी आरोपीला पकडले आणि एफआयआर नोंदवला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद नावाच्या टपाल खात्यातील निवृत्त कर्मचाऱ्याने अनेक घटनांनंतर पोलिसांत तक्रार दाखल केली होती, ज्यात त्याने दावा केला होता की त्याच्या घरातून अनेक मौल्यवान सोन्याच्या वस्तू गायब झाल्या आहेत. यामध्ये अभिनेत्रीचा यामागे हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. थोडे थोडे करुन तिने मैत्रिणीच्या घरातून १ किलो सोने लुटले.

पोलिसांनी दिलेल्या उपलब्ध माहितीनुसार, सौम्या शेट्टीने प्रसादच्या मुलीशी मैत्री केली जेव्हा ते एका फिल्म ऑडिशन कार्यक्रमात भेटले होते. मग तिचे महागडे दागिने आणि आलिशान जीवनशैली पाहून ती अनेकदा त्यांच्या घरी यायची. एके दिवशी सौम्या शेट्टीने प्रसादच्या घरातील टॉयलेटचा वापरही केला. त्यानंतर एके दिवशी कुटुंबीय लग्नासाठी तयार होत असताना त्यांना दागिने नसल्याचे आढळून आले.

एक किलो सोन्याचे दागिने लुटल्यानंतर सौम्या शेट्टी गोव्याला रवाना झाली आणि फुकटात मिळालेल्या पैशांत समुद्रकिनाऱ्यावर ऐषारामी जीवन जगत होती. मात्र माहिती मिळताच विशाखापट्टणम पोलिसांनी तिला अटक केली. सेवानिवृत्त टपाल खात्याच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती, ज्यामुळे तिला अटक करण्यात आली. सध्या विझाग गुन्हे शाखा पोलीस सौम्या शेट्टीची कोठडीत चौकशी करत आहेत. तिच्याकडून काही सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. सौम्या शेट्टी तेलगू चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. ती 'द ट्रिप' आणि 'योर्स लव्हिंगली' सारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.

Web Title: 32-year-old actress assaulted rich friend's house, stole 1 kg of gold, got arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.