लहान मुलावर लाईट कोसळली अन्...; 'गुड बॅड अग्ली' सिनेमाच्या शोदरम्यान घडली दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:17 IST2025-04-14T10:17:31+5:302025-04-14T10:17:50+5:30
'गुड बॅड अग्ली' सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान चेन्नईतील एका थिएटरमध्ये ही भयानक घटना घडल्याचं समोर आलं आहे

लहान मुलावर लाईट कोसळली अन्...; 'गुड बॅड अग्ली' सिनेमाच्या शोदरम्यान घडली दुर्दैवी घटना
गेल्या काही दिवसांपासून थिएटरमध्ये प्रेक्षक फटाके फोडण्याच्या घटना वारंवार ऐकायला मिळत आहेत. 'छावा' सिनेमा (chhaava movie) जेव्हा रिलीज झाला तेव्हा काही प्रेक्षक थिएटरमध्ये चक्क घोड्यावर स्वार होऊन आले होते. अशातच थिएटरमधील आणखी एक दुर्घटना समोर आली आहे. सध्या 'गुड बॅड अग्ली' (good bad ugly) हा साऊथचा सिनेमा चांगलाच गाजतोय. याच सिनेमाच्या एका स्क्रीनिंगदरम्यान लाईट कोसळल्याने एक लहान मुलगा जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या
थिएटरमध्ये लाईट कोसळली अन्...
मीडिया रिपोर्टनुसार १२ एप्रिलला चेन्नईतील वेट्री थिएटरमध्ये साउथ सुपरस्टार अजितची भूमिका असलेला 'गुड बॅड अग्ली' सिनेमाचा शो सुरु होता. सिनेमाच्या रिलीजच्या दिवशी जल्लोष करण्यासाठी थिएटरमध्ये खास डिस्को लाईट लावण्यात आली होती. त्यापैकी एक लाईट लहान मुलावर पडली. अचानक ही घटना घडल्याने लहान मुलगा प्रचंड घाबरला आणि ओरडायला लागला. त्या मुलाला त्वरीत उपचारासाठी नेण्यात आलं.
या घटनेमुळे त्या मुलाच्या कुटुंबीयांनी थिएटरमधील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले. या घटनेनंतर प्रकरण शांत करण्यात आलं आणि अर्ध्या तासांनी 'गुड बॅड अग्ली'चा शो पुन्हा सुरु करण्यात आला. क्रोमपेट पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी सुरु केली आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे थिएटरमध्ये काही क्षण गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. याविषयी थिएटर मालकांचा अधिकृत वक्तव्य समोर आला नाहीये. याआधीही 'गुड बॅड अग्ली' सिनेमासंबंधी एक घटना घडली होती. तामिळनाडु येथील तेनकासी थिएटरबाहेरील सिनेमाचं भलमोठं कटआऊट पोस्टर कोसळल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.