यशच्या 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' संदर्भात मोठी अपडेट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 05:35 PM2024-04-03T17:35:18+5:302024-04-03T17:36:12+5:30

Yash : रॉकिंग स्टार यशचा 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, यशचे चाहते मोठ्या पडद्यावर अभिनेत्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

A major update has come out regarding Yash's 'Toxic: A Fairy Tale for Grown-Ups' | यशच्या 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' संदर्भात मोठी अपडेट आली समोर

यशच्या 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' संदर्भात मोठी अपडेट आली समोर


पॅन इंडिया चित्रपटांपैकी एक, रॉकिंग स्टार यशचा 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, यशचे चाहते मोठ्या पडद्यावर अभिनेत्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.अशातच, गीतू मोहनदास दिग्दर्शित आणि व्यंकट के नारायण यांच्या KVN प्रॉडक्शन्स आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स द्वारे निर्मित, या चित्रपटाबद्दल एक नवीन रोमांचक अपडेट समोर आली आहे. 

रॉकिंग स्टार यश लवकरच कर्नाटकमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. याची पुष्टी करत चित्रपटाच्या निर्मात्यांनी खुलासा केला, "इष्टतम सुविधांअभावी आमचे सर्व मोठे चित्रपट राज्याबाहेर चित्रित केले जातात. रॉकिंग स्टार यशने बऱ्याच दिवसांपासून ही चिंता व्यक्त केली आहे आणि ती बदलण्यासाठी आम्ही KVN प्रॉडक्शन आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स कर्नाटकात टॉक्सिकचे शूट सुरू करत आहोत. आम्ही खूप मोठे सेट्स तयार केले आहेत, ज्यामुळे राज्यातील तळागाळातील लोक, तंत्रज्ञ आणि नवोदित प्रतिभांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. जागतिक क्षमता असलेला चित्रपट बनवण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत."

 या ठिकाणी पार पडणार शूटिंग
“निर्माते म्हणून आमच्याकडे भारतात आणि परदेशातील विविध ठिकाणचे पर्याय होते. या चित्रपटात अनेक उद्योगांतील अभिनेते आणि तंत्रज्ञ, अगदी आंतरराष्ट्रीय प्रतिभाही आहेत आणि तेथे तळ उभारणे अधिक किफायतशीर ठरले असते. तथापि, यश आणि KVN ने कर्नाटकात टॉक्सिक मुख्यालय स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आणि इतर ठिकाणी चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग करण्यापूर्वी त्यांच्या लोकांची प्रचंड क्षमता दाखवली.”, असे निर्मात्यांनी सांगितले.

या दिवशी सिनेमा येणार भेटीला

दरम्यान, चित्रपटाच्या घोषणेनंतर, एक विशेष व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये ज्वाला, जळणारे तिकीट, विदूषकाचे चित्र, सिगार ओढणारा व्यक्ती आणि बरेच काही यासारखे आकर्षक ग्राफिक्स दर्शविले गेले. गीतू मोहनदास दिग्दर्शित आणि व्यंकट के नारायण यांच्या KVN प्रॉडक्शन्स आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स द्वारे सह-निर्मित, 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' हे आतापर्यंतच्या सर्वात मनोरंजक सहयोगांपैकी एक आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: A major update has come out regarding Yash's 'Toxic: A Fairy Tale for Grown-Ups'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yash Gowda Actorयश