रश्मिका मंदानावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाली - "लवकरच पुन्हा भेटू..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 11:39 AM2024-07-18T11:39:06+5:302024-07-18T11:39:27+5:30

Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदानाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.

A mountain of grief fell on Rashmika Mandana, said - "See you again soon..." | रश्मिका मंदानावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाली - "लवकरच पुन्हा भेटू..."

रश्मिका मंदानावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाली - "लवकरच पुन्हा भेटू..."

अभिनेत्री रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna)वर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या जवळच्याने जगाचा निरोप घेतला आहे. रश्मिका मंदाना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिचं दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेत्रीचा पाळीव कुत्रा 'मॅक्सी'ने जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत 'मॅक्सी'साठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्टमध्ये लिहिले, 'तुझ्या आत्म्याला शांती लाभो, माझा सर्वोत्तम आणि सर्वात लहान मॅक्सी. आम्हाला तुझी खूप आठवण येईल आणि मला आशा आहे की आपण लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत निरोप. रश्मिका मंदानाचे कुत्र्यांवर खूप प्रेम आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या प्राण्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात. 

तीन हिंदी चित्रपटात केले काम 
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर साऊथ इंडस्ट्रीत 'पुष्पा'सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या रश्मिकाने हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला आहे. ती 'गुडबाय', 'मिशन मजनू' आणि 'ॲनिमल'मध्ये दिसली आहे. रश्मिकाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असून तिच्या गेल्या वर्षी आलेल्या 'ॲनिमल' या चित्रपटाला सर्वाधिक पसंती मिळाली.

‘ॲनिमल’ ठरला होता सुपरहिट 
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' या चित्रपटात रश्मिका मंदानाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

Web Title: A mountain of grief fell on Rashmika Mandana, said - "See you again soon..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.