तृषाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मन्सूर अली खानवर राष्ट्रीय महिला आयोगाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 05:11 PM2023-11-21T17:11:51+5:302023-11-21T17:14:45+5:30
राष्ट्रीय महिला आयोगाने अभिनेता मंसूर अली खानवर कारवाई केली आहे.
दाक्षिणात्य अभिनेता मंसूर अली खान सध्या चर्चेत आहे. मंसूरने अभिनेत्री तृषा कृष्णनबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अभिनेत्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आता राष्ट्रीय महिला आयोगाने अभिनेता मंसूर अली खानवर कारवाई केली आहे. तृषा कृष्णनवर असभ्य टिप्पणी केल्यामुळे तामिळनाडू पोलिसांना अभिनेत्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
आता राष्ट्रीय महिला आयोगाने लिहिले,'मंसूर अली खानने तृषा कृष्णाबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोग चिंतेत आहे. या प्रकरणी डीजीपीला IPC च्या कलम 509B आणि इतर संबंधित कायदे लागू करण्याचे निर्देश देत आहोत. अशा वक्तव्यामुळे महिलांवरील हिंसाचाराला सामान्य रुप मिळते आणि त्यांचा निषेध केला पाहिजे'.
The National Commission for Women is deeply concerned about the derogatory remarks made by actor Mansoor Ali Khan towards actress Trisha Krishna. We're taking suo motu in this matter directing the DGP to invoke IPC Section 509 B and other relevant laws.Such remarks normalize…
— NCW (@NCWIndia) November 20, 2023
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या थलापती विजयच्या 'लिओ' सिनेमात मंसूर अली खान आणि तृषाही झळकले आहेत. यामध्ये तृषाबरोबर एक सीन करण्याबाबत मंसूरने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. "जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचाय त्यावेळी मी मला वाटलं की हा एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन'.
पुढे तो म्हणाला, 'जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी यापूर्वीही अनेक बलात्काराचे सीन शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही. परंतु, काश्मीरमध्ये शूटिंग सुरु असताना मला तृषाला पाहायला सुद्धा दिलं नाही', असं मंसूर अली खान म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानंतर तृष्षाने संताप व्यक्त केला होता. मंसूर अली खान याचं व्यक्तव्य ऐकल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर, लियोचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.