मृत्यूच्या काही क्षणापूर्वी अभिनेत्रीनं केला होता आईला कॉल; तपासात नवा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 02:51 PM2023-09-05T14:51:55+5:302023-09-05T14:52:23+5:30
अभिनेत्री अपर्णा नायर तिरुअनंतपुरममधील तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.
काही दिवसांपूर्वी मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायर हिच्या संशयास्पद मृत्यूची बातमी समोर आली होती. ही अभिनेत्री तिच्या राहत्या घरात मृत आढळली होती. मृत्यूवेळी ती तिरुअनंतपुरम येथे राहत होती. या घटनेनंतर पोलीस प्रकरणाशी निगडीत सर्वांचा जबाब नोंदवत आहेत. त्याचसोबत बारकाईने सर्व अँगलने तपास करत आहेत. त्यात आता या प्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. ज्यात दिवंगत अभिनेत्री अपर्णा नायरची आई बिना यांनी जावयावर गंभीर आरोप लावले आहेत.
आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप
दिवंगत अभिनेत्री अपर्णा नायरची आई बीनाने मुलीला आत्महत्येसाठी पती संजीतने प्रवृत्त केले असं म्हटलं. आईचा दावा आहे की, संजीत माझ्या मुलीला मानसिकरित्या छळ करत होते. ते माझ्या मुलीच्या मृत्यूसाठी कारणीभूत आहेत असा आरोप केला. स्थानिक न्यूजनुसार, दिवंगत अभिनेत्रीने तिच्या आईसोबत व्हिडिओ कॉलवर बोलून झाल्यानंतर हे मोठे पाऊल उचलले असं सांगितले जात आहे.
अपर्णाने मृत्यूपूर्वी केला होता आईला व्हिडिओ कॉल
तर या प्रकरणी अभिनेत्री अपर्णाने आई बीनाला सांगितले की, मी आता संजीतकडून होणारा मानसिक छळ आता सहन करणार नाही असं म्हटलं. तर केवळ संजीत आणि अपर्णा या दोघांनाच त्यांच्यामध्ये काय झाले हे माहिती आहे असं आईने सांगितले. १ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी अपर्णाने कॉल केला होता आणि ती सातत्याने रडत होती.
संजीतने माझ्या मुलीची हत्या केली
दिवंगत अभिनेत्री अपर्णा नायरची आई पुढे म्हणाली- अपर्णा सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मी लगेच संजीतला फोन केला. मी त्याला दरवाजा तोडून आत जा आणि चुकीचे पाऊल उचलण्यापासून रोखण्यास सांगितले. पण संजीतने माझे ऐकले नाही. अर्ध्या तासानंतर संजीत अपर्णाच्या खोलीत गेला, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. दोघांचे वैवाहिक जीवन चांगले चालत नसल्याचेही आईने सांगितले. दोघांमध्ये अनेक समस्या होत्या.
अपर्णा नायरचा संशयास्पद मृत्यू
अभिनेत्री अपर्णा नायर तिरुअनंतपुरममधील तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. अभिनेत्रीचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी नातेवाईक आणि कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. तिच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी अभिनेत्री इंस्टाग्रामवर सक्रिय होती, ज्यामध्ये तिने बहुतेक तिच्या पती आणि मुलांचे फोटो, व्हिडिओ पोस्ट केले होते.