'कल्की २८९८ एडी'च्या दुसऱ्या भागात हा सुपरस्टार अभिनेता साकारणार श्रीकृष्ण? मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:44 IST2024-12-30T12:42:27+5:302024-12-30T12:44:36+5:30

'कल्की २८९८ एडी' सिनेमाच्या दुसऱ्या भागात हा सुपरस्टार अभिनेता श्रीकृष्णाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे

actor mahesh babu will played lord shrikrushna in kalki 2898 ad movie nag ashwin | 'कल्की २८९८ एडी'च्या दुसऱ्या भागात हा सुपरस्टार अभिनेता साकारणार श्रीकृष्ण? मोठी अपडेट समोर

'कल्की २८९८ एडी'च्या दुसऱ्या भागात हा सुपरस्टार अभिनेता साकारणार श्रीकृष्ण? मोठी अपडेट समोर

'कल्की २८९८ एडी' हा सिनेमा २०२४ मध्ये चांगलाच गाजला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली. महाभारताशी जोडलेलं आधुनिक कथानक असल्याने सिनेमाची चांगलीच चर्चाही झाली. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, कमल हासन या कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका होती. सिनेमात श्रीकृष्णाला खास पद्धतीने लोकांसमोर आणण्यात आलं. आता 'कल्की २८९८ एडी'च्या दुसऱ्या भागात मनोरंजन विश्वातील सुपरस्टार अभिनेता भूमिका साकारणार आहे. जाणून घ्या.

'कल्कीच्या दुसऱ्या भागात श्रीकृष्णाच्या भूमिकेत कोण?

'कल्की २८९८ एडी'च्या सीक्वलची सध्या चर्चा आहे. २०२४ मध्ये पहिला भाग लोकांना आवडल्याने 'कल्की २८९८ एडी' सीक्वलचं २०२५ मध्ये शूटिंग होणार आहे. 'कल्की २८९८ एडी'च्या पहिल्या भागात श्रीकृष्णाची भूमिका कृष्णकुमार बालसुब्रमण्यम या कलाकाराने साकारली. आता दुसऱ्या भागात साउथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबू श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसणार आहे. याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही तरीही 'कल्की २८९८ एडी'चे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी एका मुलाखतीत ही इच्छा व्यक्त केली होती.

'कल्की २८९८ एडी'चा सीक्वल कधी येणार?

काही दिवसांपूर्वी आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, 'कल्की २८९८ एडी'च्या सीक्वलच्या शूटिंगला दीपिका पादुकोणमुळे उशीर होत आहे. दीपिका नुकतीच आई झाल्याने ती सध्या लेक दुआकडे विशेष लक्ष देतेय. त्यामुळे दीपिकामुळे 'कल्की २८९८ एडी'च्या सीक्वलच्या शूटिंगला उशीर होतोय, अशी चर्चा आहे. शूटिंग व्यवस्थित झालं तर 'कल्की २८९८ एडी' २०२६ ला रिलीज होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. 

 

Web Title: actor mahesh babu will played lord shrikrushna in kalki 2898 ad movie nag ashwin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.