'कल्कि' सुपरहिट झाल्यानंतर प्रभासच्या नवीन सिनेमाची घोषणा, 'राजासाब'मधून दिसणार ही कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 05:44 PM2024-07-28T17:44:52+5:302024-07-28T17:46:49+5:30

प्रभासच्या आगामी रोमँटिक सिनेमाची घोषणा झाली असून अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज सर्वांना दिसणार आहे (prabhas)

actor Prabhas new movie announced the rajasaab after super hit Kalki 2898 ad | 'कल्कि' सुपरहिट झाल्यानंतर प्रभासच्या नवीन सिनेमाची घोषणा, 'राजासाब'मधून दिसणार ही कथा

'कल्कि' सुपरहिट झाल्यानंतर प्रभासच्या नवीन सिनेमाची घोषणा, 'राजासाब'मधून दिसणार ही कथा

'बाहूबली' स्टार प्रभास सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रभासचा नुकताच रिलीज झालेला 'कल्कि २८९८ एडी' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलंय. अशातच प्रभासच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमात प्रभासचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा म्हणजे 'राजासाब'. या सिनेमाचं पहिलं पोस्टर आज रिलीज झालंय. 

'राजासाब' सिनेमाची पहिली झलक आज रिलीज

प्रभासच्या आगामी 'राजासाब' सिनेमाची पहिली झलक भेटीला आलीय. 'राजासाब' सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रभास मरुन रंगाच्या सूटमध्ये दिसतोय. त्याने काळा चष्मा लावलेला दिसतोय. त्याच्यासमोर पांढऱ्या रंगाची एक गाडी असून प्रभास त्या गाडीकडे बघून फ्लाईंग किस करताना दिसतोय. प्रभासच्या 'राजासाब' सिनेमाच्या या पहिल्याच पोस्टरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या सिनेमाचा टीझर उद्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

'राजासाब' सिनेमाविषयी

दिग्दर्शक मारुती यांची 'राजासाब' ही फिल्म एक हॉरर कॉमेडी आहे. या सिनेमात प्रभासचा मस्तीपूर्ण धमाल अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सिनेमात प्रभास लांब दाढी आणि लांब केस या अवतारात दिसणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत मालविका मोहनन आणि निधी अग्रवाल हिरोईन्स म्हणून झळकण्याची शक्यता आहे. २०२५ अर्थात पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Web Title: actor Prabhas new movie announced the rajasaab after super hit Kalki 2898 ad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.