अखेर कर्करोगाशी झुंज अपयशी! प्रसिद्ध अभिनेत्याचं ब्लड कॅन्सरने ६०व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:37 IST2025-03-25T10:36:43+5:302025-03-25T10:37:01+5:30
प्रसिद्ध अभिनेता आणि कराटे चॅम्पियन शिहान हुसैनी यांचं कर्करोगाने निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. ब्लड कॅन्सरशी ते लढा देत होते. मात्र कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

अखेर कर्करोगाशी झुंज अपयशी! प्रसिद्ध अभिनेत्याचं ब्लड कॅन्सरने ६०व्या वर्षी निधन
प्रसिद्ध अभिनेता आणि कराटे चॅम्पियन शिहान हुसैनी यांचं कर्करोगाने निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. ब्लड कॅन्सरशी ते लढा देत होते. मात्र कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची ही झुंज अपयशी ठरली. आणि मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
शिहान हुसैनी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईमधील बेसंत नगरमधील हायकमांड या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ७ वाजता मदुराई येथे त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कराटे चॅम्पियन असलेल्या शिहान हुसैनी यांनी धनुर्विद्येचं शिक्षणही घेतलं होतं. ते कराटे आणि धनुर्विद्येचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचे. त्यांच्या मृत्यूनंतर कराटे आणि धनुर्विद्येने त्यांना आदरांजली वाहून त्यांना सलामी देण्याची विनंती विद्यार्थ्यांना कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
हुसैनी यांनी १९८६ साली कमल हसन यांच्या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘पुन्नागाई मन्नन’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. ‘वेलईकरन’, ‘ब्लडस्टोन’ ,‘काथुवाकुला रेंडू काधल’ आणि ‘चेन्नई सिटी गँगस्टर्स’ या सिनेमांमध्येही ते झळकले होते. ‘बद्री’या सिनेमात त्यांनी कराटे प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. त्यांनी अनेक रिएलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.