१६ वर्षीय मुलीच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला अभिनेता विजय अँथोनी, म्हणाला - "ती आता माझ्याशी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 08:56 AM2023-09-22T08:56:21+5:302023-09-22T08:56:49+5:30
Vijay Antony : अभिनेता विजय अँथोनीने आपल्या मुलीच्या निधनानंतर आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीने १९ सप्टेंबरला आत्महत्या करुन आपले जीवन संपवले.
तमीळ अभिनेता आणि म्युझिक कंपोझर विजय अँथोनीची मुलगी मीराने १९ सप्टेंबरला आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. १६ वर्षीय मीराने एवढं मोठं पाऊल का उचललं, यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. विजय अँथोनीने लेकीच्या निधनानंतर पहिल्यांदाच आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. त्याने २१ सप्टेंबरला सोशल मीडियावर मुलीसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
विजय अँथोनीने इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले की, तू माझा हिस्सा आहे, तुझ्याकडे मजबूत हृदय आहे आणि आम्ही तुझ्या वेदना समजू शकतो. लव्ह यू ऑलवेज.
'मी तिच्यासोबत मेलोय'
विजय अँथोनी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'माझ्या प्रिय लोकांनो, माझी मुलगी मीरा एक गोड आणि धाडसी मुलगी आहे. ती आता एका चांगल्या आणि शांत ठिकाणी आहे जिथे जात, धर्म, पैसा, मत्सर, वेदना, गरिबी आणि वैर नाही. ती अजूनही माझ्याशी बोलत आहे. मी तिच्यासोबत मेलो आहे. आता मी तिच्यासाठी वेळ घालवायला सुरुवात केली आहे. आता मी तिच्या वतीने चांगली कामे करीन आणि ती त्यांना दीक्षा देईल.
डिप्रेशनमध्ये होती मीरा!
अँथोनीची मुलगी मीराच्या आत्महत्येच्या वृत्तामुळे तमीळ सिनेइंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. १६ वर्षीय मीराने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती आणि त्यावर उपचार सुरू होते. ती तिच्या शाळेतील बेस्ट परफॉर्मर होती आणि चेन्नईतील सेक्रेड हार्ट मैट्रिकुलेशन शाळेत कल्चरल सेक्रेटरी हेह होती. मीरा विजयची मोठी मुलगी होती. याशिवाय त्याला एक आणखी मुलगी आहे, जिचे नाव लारा आहे.