सोने तस्करीत अडकलेली अभिनेत्री रान्या रावसोबत पती जतीन घेणार घटस्फोट, म्हणाला - "लग्न केलं तेव्हापासून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:59 IST2025-04-03T13:58:58+5:302025-04-03T13:59:24+5:30
Actress Ranya Rao : कन्नड अभिनेत्री रान्या राव सोन्याच्या तस्करी प्रकरणामुळे चर्चेत आहे. दरम्यान, तिचा पती जतीन हुक्केरी याने आता तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

सोने तस्करीत अडकलेली अभिनेत्री रान्या रावसोबत पती जतीन घेणार घटस्फोट, म्हणाला - "लग्न केलं तेव्हापासून..."
कन्नड अभिनेत्री रान्या राव (Actress Ranya Rao) सोन्याच्या तस्करी प्रकरणामुळे चर्चेत आहे. दरम्यान, तिचा पती जतीन हुक्केरी याने आता तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच जतीनने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि यावेळी त्याने रान्या रावला घटस्फोट देणार असल्याचे म्हटले आहे.
नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत जतीनने खुलासा केला की, तो रान्यापासून घटस्फोटासाठी अर्ज करणार आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, रान्या रावचे पती जतीन हुक्केरी म्हणाला की, 'आम्ही लग्न केले तेव्हापासून मला वेदना आणि त्रास होत आहे. आज मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सोन्याच्या तस्करीप्रकरणी रान्या रावच्या पतीही अडचणीत सापडला आहे. त्याची देखील चौकशी केली जात आहे. पोलिसांनी आरोप केला आहे की तो अनेकदा अभिनेत्रीसोबत दुबईला जात होता आणि तिथून सोन्याची तस्करी करत होता.
कोण आहे जतीन हुक्केरी?
जतीनने सुमारे चार महिन्यांपूर्वी रान्याशी लग्न केले, त्यानंतर ते बंगळुरूच्या अपस्केल लावेल रोड येथील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहायला गेले. व्यवसायाने वास्तुविशारद असलेल्या जतीनने बंगळुरूच्या आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाइनमध्ये बॅचलरची पदवी घेतली आहे. त्याने लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट - एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनमधून डिसरप्टिव मार्केट इनोव्हेशनमध्ये स्पेशलायझेशनसह पुढील शिक्षण घेतले आहे.
कोण आहे रान्या राव? सोन्याच्या तस्करी प्रकरणाशी काय संबंध?
रान्या राव ही पोलीस महासंचालक (कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. दुबईला वारंवार भेटी दिल्याने ती अधिकाऱ्यांच्या रडारखाली होती. गेल्या वर्षी तिने ३० वेळा दुबईला प्रवास केला होता आणि १५ दिवसांत चार वेळा प्रत्येक वेळी किलो सोने घेऊन परतली. गेल्या महिन्यात मार्चमध्ये बंगळुरू विमानतळावर अधिकाऱ्यांनी रान्याला अटक केली होती. तिच्या अटकेनंतर, बेंगळुरू महसूल गुप्तचर संचालनालयने छाप्यादरम्यान त्याच्या बंगळुरू येथील घरातून २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.
रान्याचा जामीन अर्ज तीनदा फेटाळला
सीएनएन न्यूज १८ला मिळालेल्या अटक मेमोमध्ये, DRI ने म्हटले आहे की, रान्याने १३ नोव्हेंबर आणि २० डिसेंबर रोजी दुबईत सोने खरेदी केले होते. ती जिनिव्हाला जात असल्याचे जाहीर केले होते. मात्र अटक मेमोनुसार ती भारतात आली. अटक करण्यापूर्वी किमान दोन वेळा दुबईतून सोने भारतात आणल्याचे रान्याने कबूल केले आहे. तिने सुमारे ४.८३ कोटी रुपयांचे सीमाशुल्क चुकविल्याचे डीआरआय अधिकाऱ्यांचे मत आहे. रान्याचा जामीन अर्ज आतापर्यंत तीन वेळा फेटाळण्यात आला आहे.