Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 14:19 IST2024-11-19T14:18:03+5:302024-11-19T14:19:19+5:30
शोभिता आणि नागा दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते. ऑगस्ट महिन्यात त्यांचा साखरपुडाही झाला.

Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) लवकरच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकत आहे. समंथासोबत त्याचा घटस्फोट खूप चर्चेत राहिला. आता तो अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी (Sobhita Dhulipala) लग्नगाठ बांधणार आहे. ४ डिसेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार आहे. सध्या दोघांच्याही कुटुंबात लग्नाची लगबग सुरु आहे. दरम्यान शोभिताचा वेडिंग आऊटफिट कसा असणार हे समोर आले आहे.
शोभिता आणि नागा दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते. ऑगस्ट महिन्यात त्यांचा साखरपुडाही झाला. आता पुढील महिन्यात ते सातफेरे घेणार आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, शोभिताने या महत्वाच्या दिवशी कांजीवरम साडीची निवड केली आहे. तसंच यावर सोन्याचं वर्क केलेलं असेल. या साडीतून परंपरा झळकेल. याशिवाय तिने खादीची पांढरी साडीही निवडली आहे. आंध्र प्रदेशच्या पोंडुरु शहरात ही तयार करण्यात आली आहे. शोभिता लग्नातील खास फंक्शनमध्ये ही साडी नेसणार आहे. शोभिताने आईसह या वेडिंग आऊटफिट्सला पसंती दिली आहे.
शोभिता आणि नागा चैतन्यच्या लग्नाची पत्रिकाही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली. शोभिताने होणाऱ्या नवऱ्यासाठी मॅचिंग सेट खरेदी केला आहे. दोघंही स्वत: लग्नाची तयारी करत आहेत. शोभिताला प्रत्येक गोष्टीत पारंपरिक टच हवा आहे.
नागा आणि शोभिता दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. शोभितामुळेच नागाचा घटस्फोट झाल्याचीही एक चर्चा झाली. नागा चैतन्यने २०१७ मध्ये समांथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं. लग्नाआधी ते काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ते लाडके कपल होते. पण, लग्नानंतर ४ वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. २०२१ साली घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले.