10,500 साड्या, 700 चप्पल अन् 28 किलो सोनं; इंडस्ट्रीतली सर्वात श्रीमंत अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का तिला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 01:07 PM2023-09-13T13:07:59+5:302023-09-13T13:09:25+5:30

South atress: या अभिनेत्रीने साऊथ इंडस्ट्रीवर राज्य केलं. इतकंच नाही तर कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींवरही भारी पडली.

actress-turn-to-politician-tamilnadu-former-cm-jayalalithaa-was-richest-indian-actress | 10,500 साड्या, 700 चप्पल अन् 28 किलो सोनं; इंडस्ट्रीतली सर्वात श्रीमंत अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का तिला?

10,500 साड्या, 700 चप्पल अन् 28 किलो सोनं; इंडस्ट्रीतली सर्वात श्रीमंत अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का तिला?

googlenewsNext

कलाविश्वात आज असे अनेक कलाकार पाहायला मिळतात ज्यांची गणना कायम श्रीमंत व्यक्तींच्या यादीत केली जाते. यात खासकरुन अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान या कलाकारांचा आवर्जुन उल्लेख केला जातो. मात्र, सध्या अशा एका अभिनेत्रीची चर्चा रंगलीये जिने श्रीमंतीच्या बाबतीत अनेक बड्या कलाकारांना टक्कर दिली. इतकंच नाही तर साऊथ स्टार असूनही ती कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींवर भारी पडली. आज ही अभिनेत्री आपल्यात नसली तरी सुद्धा तिच्या संपत्तीची कायम चर्चा रंगते.

सध्या कलाविश्वात अशा एका अभिनेत्रीची चर्चा रंगलीये जिने वयाच्या ३१ व्या वर्षीच सिनेसृष्टीतून संन्यास घेतला. मात्र, आयुष्यभर एवढी संपत्ती कमावली की तिची तुलना कोणतीही अन्य अभिनेत्री करु शकली नाही. त्यामुळे भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये तिचं नाव पहिले घेतलं जातं. १९८० च्या दशकात अनेकांना भूरळ पाडणारी दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे  जयललिता.

तामिळ, तेलुगू सिनेमांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्रीने १९६१ मध्ये तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. १९८६ मध्ये त्यांनी इज्जत या सिनेमातून बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं.  परंतु, १९८० च्या काळात करिअर पिकअपवर असतानाच त्यांनी इंडस्ट्री सोडली आणि राजकारणात प्रवेश घेतला.

सूत्रांच्या माहितीनुसार, जयललिता यांनी १९९७ मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. विशेष म्हणजे राजकारणातही त्यांनी चांगला जम बसवला. आज साऊथमध्ये त्यांना अम्मा याच नावाने प्रत्येक जण ओळखतो. जयललिता यांचं राजकीय करिअर सुरळीत सुरु असताना चेन्नईजवळ त्यांच्या पोएस गार्डन या निवासस्थानी  आयकर विभागाने छापेमारी केली. या छापेमारीमध्ये त्यांची अफाट संपत्तीची माहिती समोर आली.

नेमकी किती होती जयललिता यांची संपत्ती?

आयकर विभागाने मारलेल्या छापेमारीत अधिकाऱ्यांना जयललिता यांच्या घरात तब्बल साडेदहा हजार साड्या, ७५० चप्पलांचे जोड, ९१ घड्याळं, ८०० किलो चांदी आणि २८ किलो सोनं आढळून आलं. तसंच २०१६ मध्ये केलेल्या त्यांच्या संपत्तीच्या तपासात १२५० किलो चांदी, २१ किलो सोनं आढळून आलं.

दरम्यान, जयललिता यांच्याकडे ४२ कोटी रुपयांची कायदेशीर मालमत्ता होती. त्यांची एकूण संपत्ती ९०० कोटी रुपये होती. जी त्यांनी घोषित केलेल्या १८८ कोटी रुपयांपेक्षा कित्येक पटीने जास्त होती. तसंच त्या ५ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. परंतु, डिसेंबर २०१६ मध्ये वयाच्या ६८ वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.
 

Web Title: actress-turn-to-politician-tamilnadu-former-cm-jayalalithaa-was-richest-indian-actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.