'अॅनिमल'नंतर आता 'पुष्पा २'ची तयारी करणार रश्मिका मंदाना, लवकरच करणार शूटिंगला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 17:01 IST2023-12-09T17:01:08+5:302023-12-09T17:01:42+5:30
Rashmika Mandana : सध्या अभिनेत्री रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबतचा तिचा 'अॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाचा आनंद लुटत आहे, जे रेकॉर्ड मोडत आहे.

'अॅनिमल'नंतर आता 'पुष्पा २'ची तयारी करणार रश्मिका मंदाना, लवकरच करणार शूटिंगला सुरूवात
सध्या अभिनेत्री रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबतचा तिचा 'अॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाचा आनंद लुटत आहे, जे रेकॉर्ड मोडत आहे. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडते. दरम्यान, आता समजत आहे की, अभिनेत्री १३ डिसेंबरपासून अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा २: द रुलसोबत तिच्या ब्लॉकबस्टर फ्रँचायझी चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सिने इंडस्ट्रीतील एका सूत्राने सांगितले की, "रश्मिका मंदाना 'अॅनिमल' या चित्रपटासाठी मिळत असलेल्या प्रेम आणि कौतुकामुळे खूप खूश आहे. 'अॅनिमल'च्या जबरदस्त यशानंतर लवकरच रश्मिका आता हैदराबादमध्ये तिची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि ब्लॉकबस्टर फ्रेंचाइजी लॉन्च करत आहे. १३ डिसेंबरपासून. पुष्पा २: द रुलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात ती अल्लू अर्जुनसोबत श्रीवल्लीची भूमिका साकारणार आहे.
पुष्पा फ्रेंचायझीमध्ये रश्मिका मंदानाला पुन्हा एकदा श्रीवल्लीची भूमिका साकारताना पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. रश्मिकाने 'अॅनिमल'मध्ये गीतांजलीच्या भूमिकेतून चाहत्यांची आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पुष्पा २: द रुल व्यतिरिक्त, रश्मिका मंदान्ना स्त्री-आधारित चित्रपट द गर्लफ्रेंडमध्ये देखील दिसणार आहे.