चार दिवसाच्या शूटिंगनंतर प्रभासच्या सिनेमातून रकुलला दाखवला बाहेरचा रस्ता, अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 05:30 PM2024-10-14T17:30:48+5:302024-10-14T17:32:08+5:30

Rakul Preet Singh : चार दिवसांच्या शूटिंगनंतर प्रभासच्या चित्रपटातून तिला अचानक कसे काढून टाकण्यात आले याबद्दल रकुल प्रीत सिंगने खुलासा केला आहे.

After four days of shooting, Rakul Preet Singh was shown the way out of Prabhas film, reveals the actress | चार दिवसाच्या शूटिंगनंतर प्रभासच्या सिनेमातून रकुलला दाखवला बाहेरचा रस्ता, अभिनेत्रीचा खुलासा

चार दिवसाच्या शूटिंगनंतर प्रभासच्या सिनेमातून रकुलला दाखवला बाहेरचा रस्ता, अभिनेत्रीचा खुलासा

रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची फॅन फॉलोइंग लाखोंच्या घरात आहे आणि ती तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. रकुलने तिच्या करिअरची सुरुवात कन्नड आणि तेलुगू चित्रपटातून केली होती. यारियां चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या मुंबईतील सुरुवातीच्या संघर्षांबद्दल खुलासा केला. यादरम्यान, चार दिवसांच्या शूटिंगनंतर प्रभास(Prabhas)च्या चित्रपटातून तिला अचानक कसे काढून टाकण्यात आले याबद्दल रकुल प्रीत सिंगने खुलासा केला आहे.

फिल्मफेअरशी बोलताना रकुल म्हणाली, "मला वाटायचं की मला भूमिका मिळाली नाही तर काही फरक पडत नाही, माझ्यासाठी काहीतरी वेगळं आहे. मी त्यावेळी कांदिवलीत राहत होते. मी अभिनेता /मॉडेल सर्किटपासून दूर होते. मी परिश्रमपूर्वक काम करत होते. बरेच रिजेक्शनही झेलले होते. तेलगूत एक सिनेमा होता, ज्यासाठी मी चार दिवस शूट केले आणि नंतर मला रिप्लेस करण्यात आले. हा चित्रपट प्रभाससोबत होता. 

माझ्या जागी काजल अग्रवालची वर्णी लागली

ती म्हणाली की, हे माझ्या चांगल्यासाठीच होते. त्यावेळी मी नवीन होते आणि कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होते. मी माझ्या परिक्षेचा अभ्यासपण सेटवर करत होते. चित्रपटाचे नाव होते मिस्टर परफेक्ट. पहिला शेड्युल संपल्यानंतर जेव्हा मी दिल्लीला गेले तेव्हा मला कळलं की माझ्या जागी काजल अग्रवालची सिनेमात वर्णी लागली. शूटिंगदरम्यान काजल आणि प्रभासची आणखी एक सिनेमा रिलीज झाला होता आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यामुळे निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटात त्याच कलाकारांची पुनरावृत्ती करण्याचा विचार केला. तो एक व्यावसायिक निर्णय होता. नवोदित मुलींना अनेकदा असे रिप्लेस करण्यात येते.

रकुल म्हणाली, "मी परत दिल्लीला गेले आणि त्यांनी मला सांगितले की ते मला दुसऱ्या शेड्युलबद्दल सांगतील. मी जेव्हा दिल्लीला परतले तेव्हा मला कळले की माझी बदली झाली आहे. मी म्हणाले ठीक आहे. माझ्यासाठी काहीतरी चांगले होईल.

वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर काजल नुकतीच कमल हासनच्या इंडियन चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती सिद्धार्थसोबत दिसली होती. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीकडे इंडियन ३ आणि दे दे प्यार दे २ सारखे बिग बजेट चित्रपट आहेत.

Web Title: After four days of shooting, Rakul Preet Singh was shown the way out of Prabhas film, reveals the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.