Pushpa 2 साठी अल्लू अर्जुननं मानधन न घेण्याचा घेतला निर्णय, तरीही कमावणार इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:50 PM2023-11-27T12:50:13+5:302023-11-27T12:54:09+5:30

साऊथचा स्टायलिश स्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या पुष्पा: द रुल(Pushpa: The Rule)च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Allu Arjun decided not to take remuneration for Pushpa 2, but will still earn so many crores | Pushpa 2 साठी अल्लू अर्जुननं मानधन न घेण्याचा घेतला निर्णय, तरीही कमावणार इतके कोटी

Pushpa 2 साठी अल्लू अर्जुननं मानधन न घेण्याचा घेतला निर्णय, तरीही कमावणार इतके कोटी

साऊथचा स्टायलिश स्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या पुष्पा: द रुल(Pushpa: The Rule)च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अभिनेत्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी २०२१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा पहिला भाग तिकीटबारीवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनय आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचे दोन राष्ट्रीय पुरस्कारही जिंकलेत. दरम्यान, त्याच्या सीक्वलबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुननेपुष्पाच्या सिक्वेलसाठी मानधन घेण्यास नकार दिला आहे. खरेतर, अभिनेत्याने चित्रपटाच्या कमाईतील नफ्यात वाटा मागितला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने चित्रपटासाठी ३३ टक्के नफा मागितला आहे. यामध्ये डिजिटल आणि सिनेमाच्या राइट्सच्या रकमेचाही समावेश आहे.

पुष्पा २ चित्रपटाबद्दल निर्मात्यांना पूर्ण विश्वास वाटत आहे. याच कारणामुळे निर्मात्यांनी पुष्पा २ साठी परदेशी वितरकांकडून जवळपास १०० कोटी रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम एसएस राजामौली यांच्या आरआरआरपेक्षा कितीतरी जास्त आहे. पुष्पा २ बद्दल सांगायचे तर, फहद फासिल, रश्मिका मंदाना, सुनील, प्रकाश राज, जगपती बाबू आणि इतर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. माइथ्री मुव्ही मेकर्स या बॅनरखाली नवीन येरनेनी आणि यालामंचिली रविशंकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पुष्पा २ पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे.

वर्कफ्रंट

याशिवाय अल्लू अर्जुनच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर, तो त्रिविक्रम श्रीनिवाससोबत AA22 साठी पुन्हा काम करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हा एक पीरियड अॅक्शन फिल्म असेल आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर आधारित असेल. या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Allu Arjun decided not to take remuneration for Pushpa 2, but will still earn so many crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.