अल्लू अर्जुनने बॉलिवूडच्या या खानला केलं रिप्लेस? एटलीच्या सिनेमात झळकणार तीन अभिनेत्रींसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 09:15 IST2025-03-04T09:15:04+5:302025-03-04T09:15:40+5:30
Allu Arjun: अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचा दिग्दर्शक एटली कुमार लवकरच एक चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटात तो या दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याच्या जागी अल्लू अर्जुनला कास्ट करणार आहे.

अल्लू अर्जुनने बॉलिवूडच्या या खानला केलं रिप्लेस? एटलीच्या सिनेमात झळकणार तीन अभिनेत्रींसोबत
अभिनेता शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या 'जवान' (Jawan Movie) या चित्रपटाचा दिग्दर्शक एटली कुमार (Atlee Kumar) लवकरच एक चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटात तो या दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याच्या जागी अल्लू अर्जुन(Allu Arjun)ला कास्ट करणार आहे. हा अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान. दिग्दर्शक एटली आता अल्लू अर्जुनला सलमानच्या जागी कास्ट करणार असून या चित्रपटात एक नव्हे तर तीन अभिनेत्री दिसणार आहेत. अखेर हा चित्रपट सलमान खान(Salman Khan)च्या हातून का निसटला ते जाणून घेऊयात.
पीपिंग मूनच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खान दिग्दर्शक एटली कुमारच्या आगामी चित्रपटात दिसणार नाही. अभिनेता सलमानऐवजी 'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुन आता या चित्रपटात दिसणार आहे. रिपोर्टनुसार, दिग्दर्शक एटली याआधी सलमान खानसोबत पुनर्जन्म थीमवर आधारित ६०० कोटी रुपयांच्या बजेटचा ॲक्शन चित्रपट घेऊन येणार होता. आता त्याने आपला विचार बदलला आहे.
या कारणामुळे सलमानच्या हातून गेला सिनेमा
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता सलमान खानच्या मागील चित्रपटांमधील अभिनयामुळे एटलीने त्याला इतक्या मोठ्या चित्रपटात कास्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे. सन पिक्चर्स या मल्टीस्टारर चित्रपटासाठी फंडिग करण्याची योजना आखत आहे. याआधी दिग्दर्शकाला सलमान खान आणि रजनीकांतसोबत हा चित्रपट बनवायचा होता. आता आपली योजना बदलून टलीने अल्लू अर्जुनला कास्ट केले आहे आणि तो दुसऱ्या अभिनेत्याचा शोध घेत आहे.
एक-दोन नाही तर तीन अभिनेत्री दिसणार सिनेमात
एटली कुमार यांच्या आगामी ॲक्शन चित्रपटात तीन अभिनेत्री दिसणार आहेत. यात जान्हवी कपूरचे नाव मुख्य भूमिकेत आघाडीवर आहे. या बिग बजेट चित्रपटाचे शूटिंग वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.