अल्लू अर्जुन बदलणार त्याचं नाव! 'पुष्पा २'चं यश आहे कारणीभूत? जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:46 IST2025-04-01T12:45:41+5:302025-04-01T12:46:09+5:30
Allu Arjun : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 'पुष्पा' सिनेमानंतर देशभरात त्याचे फॅन फॉलोव्हिंग वाढले आहे.

अल्लू अर्जुन बदलणार त्याचं नाव! 'पुष्पा २'चं यश आहे कारणीभूत? जाणून घ्या याबद्दल
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 'पुष्पा' सिनेमानंतर देशभरात त्याचे फॅन फॉलोव्हिंग वाढले आहे. त्याच्या 'पुष्पा २' (Pushpa 2 Movie) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई तर केलीच पण त्याची कारकीर्दही सातव्या आसमानवर पोहचली आहे. दरम्यान, आता तो नाव बदलणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अहो घाबरू नका! तो पूर्ण नाव नाही, पण काही स्पेलिंग जोडण्याचा विचार केला जात आहे.
'कोईमोई' आणि 'सिने जोश'च्या रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुन त्याचे नाव बदलण्याचा विचार करत आहे. सिने जोशमधील एका रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन अंकशास्त्रीय सल्ल्यानुसार त्याच्या नावात दोन 'यू' आणि दोन 'एन' जोडण्याची शक्यता आहे. अल्लू अर्जुनचे यश आणखी वाढवण्याचा आणि त्याची आधीच भरभराट होत असलेली कारकीर्द मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अभिनेत्याने अद्याप अधिकृतपणे या वृत्ताची पुष्टी केलेली नाही.
टलीसोबतच्या चित्रपटाची ८ एप्रिलला होणार घोषणा!
दरम्यान, अल्लू अर्जुन त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असतो. त्याच्याकडे एटलीचा पॅन इंडिया चित्रपट आहे. त्याचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. सध्या याला AA22 असे नाव देण्यात आले आहे. ८ एप्रिलला अभिनेत्याच्या वाढदिवसादिवशी त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अल्लू अर्जुन दिसणार पौराणिक सिनेमात
याशिवाय अल्लूचा दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवाससोबत एक पौराणिक चित्रपट आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात भगवान कार्तिकेयची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची निर्मिती मोठ्या पातळीवर केली जात आहे, जो तेलगूमध्ये आतापर्यंत न पाहिलेल्या अशा अंदाजात बनवला जातोय.
चाहते 'पुष्पा ३'च्या प्रतीक्षेत
चाहते अल्लू अर्जुनला 'पुष्पा ३'मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तिसऱ्या भागाची घोषणा 'पुष्पा २'मध्येच झाली होती.