'पुष्पाःद रुल'च्या शूटिंग सेटवरील अल्लू अर्जुनचा लूक झाला लीक, फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 05:10 PM2024-01-30T17:10:33+5:302024-01-30T17:10:59+5:30
Pushpa Movie : दिग्दर्शक सुकुमारचा 'पुष्पा: द राइज' डिसेंबर २०२१ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. अल्लू अर्जुन, फहद फासिल आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
अभिनेता अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा 'पुष्पा: द रुल' (Pushpa:The Rule) हा २०२४ च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे आणि त्याचे शूटिंग जोरात सुरू आहे. दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील फोटो लीक झाले आहेत. ऑनलाइन लीक झालेला फोटो इंस्टाग्रामवर ट्रेंड करत आहे. फोटोमध्ये, अल्लू अर्जुन 'गंगम्मा थल्ली' अवतारात दिसतो आहे. जो फर्स्ट-लूक पोस्टरमध्ये देखील शेअर करण्यात आला होता. सुकुमार दिग्दर्शित, 'पुष्पा: द रुल' ऑगस्ट २०२४ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अलीकडेच 'पुष्पा २'च्या सेटवरील अल्लू अर्जुनचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या लीक झालेल्या फोटोमध्ये अभिनेत्याने साडी नेसलेली दिसत आहे. साडी नेसलेल्या अर्जुनचे फर्स्ट लूक पोस्टर आठवतो आहे ना? लीक झालेला फोटो आयकॉनिक पोस्टरची आठवण करून देतो.
चित्रपटाच्या फर्स्ट-लूक पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन एका महिलेच्या वेशात दिसत आहे, कारण तो तिरुपतीमध्ये प्रचलित असलेल्या 'गंगाम्मा तल्ली जथारा'मध्ये सहभागी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी ‘गंगाम्मा तल्ली जथारा’ आठवडाभर साजरा केला जातो. शेवटच्या दिवसात, पुरुष स्त्रियांच्या वेशभूषा करतात आणि गंगामाच्या रूपात दिसतात.
'पुष्पा: द रुल' या दिवशी येणार भेटीला
दिग्दर्शक सुकुमारचा 'पुष्पा: द राइज' डिसेंबर २०२१ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. अल्लू अर्जुन, फहद फासिल आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील संगीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे. याच टीमसोबत चित्रपटाचा दुसरा भागही तयार केला जात आहे. अलीकडेच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा निश्चित केली होती. हा चित्रपट १५ ऑगस्ट, २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगु आणि हिंदी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट असेल आणि तो ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनवला जात आहे. चित्रपटात अनेक नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे.