२३ मिनिटांच्या बोनस फुटेजसह 'पुष्पा २: द रुल' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:26 IST2025-01-30T13:25:50+5:302025-01-30T13:26:28+5:30
'पुष्पा 2: द रुल' सिनेमा Reloaded version सह ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

२३ मिनिटांच्या बोनस फुटेजसह 'पुष्पा २: द रुल' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येणार?
Allu Arjun's Pushpa 2 Ott Release: सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 : The Rule) हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. अगदी पहिल्या दिवासपासून सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. जो अद्याप कोणत्या प्रसिद्ध बॉलिवूड स्टारच्या सिनेमाला देखील मिळालेला नाही. अल्लू अर्जूननं अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, प्रभास या सर्वांचे रेकॉर्ड मोडले आणि भारतात सर्वांत जास्त कमाई करत नवा विक्रम रचला. अल्लू अर्जुनचे चाहते या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची (OTT Release) वाट पाहत होते. आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
अल्लू अर्जुनचा हा मेगा ब्लॉकबास्टर सिनेमा ओटीटीवर धडकला आहे. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता पुष्पाभाऊ ओटीटीवर धुमाकूळ घालतोय. नेटफ्लिक्स (Pushpa 2 Released On Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यात खास बाब म्हणजे 'पुष्पा 2: द रुल'चं Reloaded version रिलीज झाला आहे. म्हणजेच त्यात २३ मिनिटांचे न पाहिलेले फुटेज देखील आहे. ज्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात पाहिला नाही आणि ज्यांना सिनेमा परत पाहण्याची इच्छा आहे, ते आता OTT वर हा चित्रपट पाहू शकणार आहेत.
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाचं प्रत्येकजण कौतुक करत आहे. अल्लू अर्जूनशिवाय, अभिनेत्री रश्मिका मंदाना, फहाद फासिल, सुनील, राव रमेश आणि जगपती बाबू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाचं बजेट हेजवळपास ५५० कोटी रुपये होतं. अवघ्या ३-४ दिवसांत बजेट वसूल करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला. हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. तर जगभरात १८०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. जगभरात 1800 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. अल्लू अर्जून हा आमिर खानच्या दंगलचा विक्रम मोडण्यापासून फक्त काही कोटी दूर आहे. सध्या, पुष्पा 2 हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे.