'पुष्पा २'च्या दिग्दर्शकाने केलेलं कौतुक ऐकून अल्लू अर्जुनचे पाणावले डोळे, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 02:08 PM2024-12-03T14:08:23+5:302024-12-03T14:08:51+5:30
Allu Arjun : साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या 'पुष्पा २' (Pushpa 2) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकताच हैदराबादमध्ये या चित्रपटाचा प्रमोशन कार्यक्रम पार पडला. जिथे अल्लू अर्जुन भावूक झाला. त्याचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा दिग्दर्शक सुकुमारने अल्लू अर्जुनचे कौतुक केले तेव्हा त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
अल्लू अर्जुनबद्दल बोलताना सुकुमार म्हणाले की, एक गोष्ट निश्चित आहे: माझा प्रवास आर्यापासून सुरू झाला. मी बनीला वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून वाढताना पाहिले आहे, त्याला जवळून पाहिले आहे. आज जर पुष्पा आहे तर ते अल्लू अर्जुनवरील माझ्या प्रेमामुळे आहे. तो अगदी छोट्या छोट्या अभिव्यक्तींसाठीही लढतो आणि हीच माझी ऊर्जा आहे. अल्लू अर्जुन, मी तुझ्यासाठी हा चित्रपट बनवला आहे.
अल्लू अर्जुन झाला भावुक
सुकुमार पुढे म्हणाले की, 'जेव्हा मी पहिल्यांदा तुला संपर्क साधला तेव्हा माझ्याकडे संपूर्ण कथा नव्हती, फक्त दोन ओळी. तुमच्या समर्पणाने मला विश्वास दिला की आपण काहीही साध्य करू शकतो. अल्लू अर्जुन, हे तुझ्यासाठी आहे. चाहत्यांना संबोधित करताना, मला पुष्पा ३ बद्दल सांगायचे आहे, मी पुष्पा २साठी तुमच्या नायकाला त्रास दिला, आणि जर त्याने मला आणखी तीन वर्षे दिली तर मी ते बनवेल. सुकुमारचे म्हणणे ऐकून अल्लू अर्जुन भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
"మా ఇద్దరి బొండింగ్ అనేది 'Exchange Of Energy'. డార్లింగ్ ఈ సినీమా నీ కోసం తియ్యడం తప్ప ఇంకేం లేదు!" #Sukumar about #AlluArjunpic.twitter.com/fblLkPNZdH
— Rajesh Manne (@rajeshmanne1) December 2, 2024
'पुष्पा २'बद्दल
पुष्पा २ बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानासोबत फहद फासिल देखील या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे.