तमन्ना भाटियाच्या ‘कावालिया’ गाण्यावर अमृता फडणवीसांचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 16:38 IST2023-09-14T16:32:59+5:302023-09-14T16:38:33+5:30
Lokmat Most Stylish Award : दाक्षिणात्य गाण्यावर थिरकल्या अमृता फडणवीस, व्हिडिओ व्हायरल

तमन्ना भाटियाच्या ‘कावालिया’ गाण्यावर अमृता फडणवीसांचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहिलात का?
‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळा’ नुकताच पार पडला. मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांचा या पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला. कलाविश्वातील सेलिब्रिटींनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. सिनेतारकांमुळे या सोहळ्याला चार चांद लावले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती.
अमृता फडणवीसांनी या अवॉर्ड सोहळ्यासाठी खास लूक केला होता. त्यांनी काळ्या रंगाचा वन पीस आणि हाय हिल्स घालून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या अवॉर्ड सोहळ्यात अमृता फडणवीस तमन्ना भाटियाच्या ट्रेंडिंग ‘नुका वालिया’ गाण्यावर थिरकलेल्या पाहायला मिळालं. ‘नुका वालिया’ या गाण्याच्या गायिका शिल्पा राव यांनाही मोस्ट स्टायलिश सिंगर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या मनिष पॉलने शिल्पा राव यांना ऑन स्टेज हे गाणं गाण्याची विनंती केली.
मनीष पॉलने अमृता फडणवीस यांना ‘नुका वालिया’ गाण्यावर त्याच्याबरोबर डान्स करण्याचा आग्रह केला. ऑन स्टेज नुका वालिया गाण्यावर अमृता फडणवीस थिरकल्या. त्यांनी तमन्ना भाटियाच्या या ट्रेंडिंग गाण्याच्या हुक स्टेपही केल्या. लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यातील अमृता फडणवीसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.