तोंडावर मास्क अन् गुंडांना लोळवणारा पोलीस! KGF च्या मेकर्सचा नवा सिनेमा 'बघिरा', उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:31 IST2024-10-21T14:30:30+5:302024-10-21T14:31:15+5:30
KGF आणि कांताराच्या मेकर्सने बघिरा या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केलाय. अल्पावधीत हा ट्रेलर व्हायरल झालाय (bagheera)

तोंडावर मास्क अन् गुंडांना लोळवणारा पोलीस! KGF च्या मेकर्सचा नवा सिनेमा 'बघिरा', उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज
भारतीय मनोरंजनविश्वात KGF आणि 'कांतारा' या दोन सिनेमांचा स्वतःचा एक चाहतावर्ग आहे. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरही चांगलं यश संपादन केलंय. या सिनेमांचा विषय, कथेची मांडणी अशा अनेक गोष्टी नाविन्यपूर्ण होत्या. त्यामुळे आजही हे सिनेमे आवडीने पाहिले जातात. KGF आणि 'कांतारा'च्या मेकर्सने नवीन सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमाचं नाव 'बघिरा'. या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय.
'बघिरा' सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
'बघिरा' सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. या ट्रेलरमध्ये एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दिसतो. या पोलीस अधिकाऱ्याच्या भोवती भ्रष्टाचाराचं रान माजलं असतं. त्यामुळे तो स्वतःची ओळख लपवून रात्री गुंडांना यमसदनी धाडतो. परंतु नंतर घटना अशा घडतात की हाच पोलीस अधिकारी शहरातला मोस्ट वॉन्टेड माणूस होतो. पुढे काय घडतं? पोलीस अधिकाऱ्याची ओळख सर्वांना कळणार का, हे सिनेमा आल्यावरच कळेल.
कधी रिलीज होणार 'बघिरा'
KGF, कांतारा सिनेमांची निर्मिती करणाऱ्या Hombale Films ने 'बघिरा'ची निर्मिती केलीय. हा सिनेमा ३१ ऑक्टोबरला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलीज करण्यात येणार आहे. रुक्मिणी वसिष्ठ आणि श्रीमुरली या कलाकारांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. प्रशांत नील यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'बघिरा'च्या ट्रेलरला अल्पावधीत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. लाखांच्या घरात सिनेमाच्या ट्रेलरला व्ह्यूज मिळाले आहेत. सर्वांना 'बघिरा' पाहायची उत्सुकता आहे.