महाभारतातील बकासुराच्या कहाणीवर आधारीत नव्या सिनेमाची घोषणा; हा अभिनेता साकारणार भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:05 IST2025-03-11T12:04:48+5:302025-03-11T12:05:58+5:30

महाभारतातील सर्वांना छळणाऱ्या बकासुरावर सिनेमा येत असून सर्वांना उत्सुकता आहे

Bahubali actor Prabhas will now become Bakasur in prashant varma upcoming movie | महाभारतातील बकासुराच्या कहाणीवर आधारीत नव्या सिनेमाची घोषणा; हा अभिनेता साकारणार भूमिका?

महाभारतातील बकासुराच्या कहाणीवर आधारीत नव्या सिनेमाची घोषणा; हा अभिनेता साकारणार भूमिका?

'बाहुबली' सिनेमातून संपूर्ण भारतीयांच्या मनावर राज्य केलेला अभिनेता म्हणजे प्रभास. (prabhas) 'आदिपुरुष' सिनेमात प्रभासने प्रभू श्रीरामांची भूमिकाही साकारली. या ऐतिहासिक आणि पौराणिक सिनेमानंतर प्रभास आता महाभारतावर आधारीत एका सिनेमात थेट राक्षस असलेल्या बकासुराची भूमिका साकारताना दिसणार आहे. याविषयीची एक मोठी माहिती आज समोर येतेय. जाणून घ्या सविस्तर

प्रभास होणार बकासुर

काही महिन्यांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या 'हनुमान' सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा आगामी सिनेमाच्या तयारीसाठी  सज्ज आहे. या सिनेमाचं नाव आहे 'बका'. महाभारतातील राक्षस बकासुरावर हा सिनेमा आधारीत असल्याचं बोललं जात होतं. ग्रामीण भागात हा बकासुर सामान्य माणसांचा बळी द्यायचा. लोकांच्या जवळचा जेवणाचा साठा संपेल इतकी त्याला भूक लागायची. सामान्य माणसांचा अतोनात छळ करुन बकासुराने सर्वांच्या नाकीनऊ आणले होते. याच बकासुराचा पुढे भीमाने वध केला. 

प्रभास याच बकासुराच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा असल्याने चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रभासच्या आगामी वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो सध्या 'स्पिरीट', 'सालार २', 'राजा साब' अशा आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय २०२४ मध्ये प्रभासच्या रिलीज झालेल्या 'कल्की' सिनेमाचा सीक्वल अर्थात 'कल्की २' मध्येही प्रभास झळकणार आहे. त्यामुळे सर्वांना प्रभासच्या आगामी सिनेमांची उत्सुकता आहे.
 

Web Title: Bahubali actor Prabhas will now become Bakasur in prashant varma upcoming movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.