धक्कादायक! सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेऊन संपवलंं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 17:30 IST2024-04-28T17:29:28+5:302024-04-28T17:30:49+5:30
प्रसिद्ध अभिनेत्रीने राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवल्याने मनोरंजन विश्वाला धक्का बसलाय

धक्कादायक! सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेऊन संपवलंं जीवन
भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. अभिनेत्रीचा मृतदेह भागलपूरमध्ये सापडला. आदमपूर परिसरातील दिव्या धाम अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 104 मध्ये पंख्याच्या साहाय्याने साडीच्या फासावर लटकलेल्या अवस्थेत अभिनेत्रीचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलाय. स्थानिक लोकांच्या मदतीने अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी तिला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अमृताच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच जोगसर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला चौकशीसाठी बोलावून सर्व पुरावे गोळा केले. पोलिसांनी अभिनेत्रीच्या मोबाईलची झडती घेतली असता गळफास घेण्याआधी सकाळी १०.१५ वाजता अमृताने तिच्या व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकल्याचे आढळून आले. त्यावर लिहिले होते, "दोन बोटींवर त्याचं आयुष्य अवलंबून का होतं? आम्ही एक बोट बुडवून त्याचं आयुष्य सोप्पं केलं."
ସନ୍ଦିଗ୍ଧ ଅବସ୍ଥାରେ ମିଳିଲା ଅଭିନେତ୍ରୀଙ୍କ ମୃତଦେହ #ActressDead#AmrutaPandey#BhojpuriActresshttps://t.co/LeEdZ093jR
— Odisha Reporter (@OdishaReporter) April 28, 2024
पोलिसांनी केलेल्या तपासणीनुसार अमृता गेल्या अनेक दिवसांपासून काम न मिळाल्याने नैराश्याचा सामना करत होती असं कुटुंबीयांचं म्हणणे आहे. अमृता डिप्रेशनवर उपचारही घेत होती. परंतु नुकतंच अमृताच्या 'प्रतिशोध' या हॉरर वेब सीरिजचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला. याबद्दल ती खूप उत्साहितही होती. परंतु अचानक गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवल्याने पोलिसांनी तिच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला असून सखोल तपास सुरु आहे.