वाढदिवशी चाहत्यांना गिफ्ट! कियाराचा 'गेमचेंजर' सिनेमातील मनमोहक लूक रिलीज, रामचरण प्रमुख भुमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 02:46 PM2024-07-31T14:46:45+5:302024-07-31T14:55:51+5:30

कियारा अडवाणीचा आज वाढदिवस असून तिच्या वाढदिवशी रामचरणसोबतच्या सिनेमातील तिचा खास लूक शेअर करण्यात आलाय (kiara advani)

bollywood actress kiara advani first look reveal in gamechanger movie with ramcharan | वाढदिवशी चाहत्यांना गिफ्ट! कियाराचा 'गेमचेंजर' सिनेमातील मनमोहक लूक रिलीज, रामचरण प्रमुख भुमिकेत

वाढदिवशी चाहत्यांना गिफ्ट! कियाराचा 'गेमचेंजर' सिनेमातील मनमोहक लूक रिलीज, रामचरण प्रमुख भुमिकेत

अभिनेत्री कियारा अडवाणीचा आज वाढदिवस. कियाराला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. कियाराच्या प्रत्येक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. कियारा आता RRR फेम अभिनेता रामचरण सोबत आगामी गेम चेंजर सिनेमात झळकणार आहे. या सिनेमातील कियाराचा फर्स्ट लूक आज तिच्या बर्थडेनिमित्त रिव्हिल करण्यात आलाय. जांभळ्या रंगाच्या घागऱ्यामध्ये कियाराचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. 

कियाराचा गेम चेंजरमधील लूक रिव्हिल

कियारा आणि रामचरण 'गेमचेंजर' हा सिनेमा २०२४ मधील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. काहीच दिवसांपूर्वी या सिनेमातील कियारावर चित्रित झालेल्या गाण्याची झलकही दिसली. या गाण्यात कियारा आणि रामचरणची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली. अशातच आज कियाराच्या वाढदिवसानिमित्त सिनेमातील तिचा लूक रिव्हिल करण्यात आलाय. कियारा या सिनेमात 'जबीलम्मा' नावाची भूमिका साकारणार आहे. कियाराचा पारंपरिक तरीही ग्लॅमरस अंदाज लोकांना चांगलाच आवडलेला दिसतोय.

कियारा-रामचरणचा गेमचेंजर कधी रिलीज होणार 

एस.शंकर 'गेमचेंजर' सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. हा सिनेमा एक पॉलिटिक थ्रिलर आहे. याशिवाय या सिनेमात रामचरण दुहेरी भूमिकेत म्हणजेच डबल रोल निभावताना दिसणार आहे. या सिनेमात रामचरण - कियारासोबतच एसजे सूर्या, जयराम, सुनील, श्रीकांत, समुथिरकानी आणि इतर कलाकार पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा सप्टेंबर २०२४ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. कियारा-रामचरणची केमिस्ट्री कशी रंगणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: bollywood actress kiara advani first look reveal in gamechanger movie with ramcharan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.