कोण होता तो खलनायक ? ज्याशिवाय काम करण्यास रजनीकांतने दिला होता स्पष्ट नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:09 AM2024-12-04T10:09:15+5:302024-12-04T10:09:28+5:30
एक खलनायक होता, जो रजनीकांतचा लाडका होता.
80 च्या दशकात एक खलनायक होता, ज्याने खलनायकाची व्याख्याच बदलून टाकली होती. त्याने आपल्या कारकिर्दीतील अर्ध्याहून अधिक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. या खलनायकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळ स्थान निर्माण केलं. त्यानं आपल्या दमदार संवादांनं अशी अमिट छाप सोडली की पडद्यावर त्याला पाहून सर्वसामान्य लोक भीतीने थरथर कापू लागले. तो स्टार्सचा लाडका बनला.
विशेष म्हणजे सुपरस्टार रजनीकांत याने जर हा खलनायक चित्रपटात नसेल तर चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्याला रजनीकांत आपला लकी चार्म समजायचे. तो प्रसिद्ध खलनायक 'रघुवरन'. 11 डिसेंबर 1958 रोजी केरळमध्ये जन्मलेल्या रघुवरनने 1982 साली 'येरुवधन मनिथन' या तमिळ चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. ज्याला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. रघुवरन यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीत हिंदी आणि दक्षिण चित्रपटांसह 200 हून अधिक चित्रपट केले.
90 च्या दशकात रघुवरनची रजनीकांतसोबतची खलनायक जोडी खूप लोकप्रिय झाली होती. एक काळ असा होता की, रजनीकांतने बड्या निर्मात्यांसमोर एक अटही ठेवली होती की, त्याच्या चित्रपटात खलनायक 'रघुवरन' असावा, अन्यथा तो चित्रपट करणार नाही. निर्मात्यांनाही रजनीकांतच्या या मुद्द्याकडे दुर्लक्ष करता आले नाही आणि त्यांनी रघुवरनला रजनीकांतसोबत जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून कास्ट केले. आपल्या कारकिर्दीत सातत्याने यशाची शिडी चढणारा प्रसिद्ध खलनायक रघुवरन यांचे वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. जास्त मद्यपान केल्यामुळे त्याचे दोन्ही अवयव निकामी झाले होते. 19 मार्च 2008 रोजी अभिनेत्याचे निधन झाले.