डेव्हिड वॉर्नरच्या रॉबिनहूड सिनेमाचा ट्रेलर पाहिला? लॉलीपॉप खात हेलिकॉप्टरमधून शानदार एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:33 IST2025-03-25T14:32:55+5:302025-03-25T14:33:08+5:30
'रॉबिनहूड' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये डेव्हिड वॉर्नरची एक झलक पाहूनच चाहते खूश झालेत.

डेव्हिड वॉर्नरच्या रॉबिनहूड सिनेमाचा ट्रेलर पाहिला? लॉलीपॉप खात हेलिकॉप्टरमधून शानदार एन्ट्री
Cricketer David Warner Movie Robinhood: ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) हा सध्या चांगलाचा चर्चेत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तो पदार्पण करतोय. डेव्हिड वॉर्नर हा 'रॉबिनहूड' (Robinhood) या तेलुगू चित्रपटामध्ये कॅमिओ रोलमध्ये आहे. काल 'रॉबिनहूड' (Robinhood) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात डेव्हिड वॉर्नरही पोहचला होता. 'रॉबिनहूड' चा ट्रेलर पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूपच आतुर झाले आहेत.
'रॉबिनहूड' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये डेव्हिड वॉर्नरची खास झलक पाहायला मिळाली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधलंय. ट्रेलरच्या शेवटी डेव्हिड वॉर्नर लॉलीपॉप खात हेलिकॉप्टरमधून शानदार एन्ट्री घेताना दिसतो. एकदम कडक लूकमध्ये तो पाहायला मिळाला आहे. ट्रेलरमध्ये डेव्हिड वॉर्नरची एक झलक पाहूनच चाहते खूश झालेत.
डेव्हिड वॉर्नर भारतीय सिनेमांचा किती वेडा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. अनेकदा डेव्हिड वॉर्नर क्रिकेटच्या मैदानात 'पुष्पा' स्टाईल करताना दिसला. याशिवाय काही महिन्यांपूर्वी डेव्हिड आणि राजामौली एका जाहिरातीत एकत्र दिसले होते. आता डेव्हिड वॉर्नरला थेट चित्रपटात झळकतोय. 'रॉबिनहूड' चित्रपटात त्याचा अभिनय पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
'रॉबिनहूड' चा ट्रेलर लाँच सोहळ्यात डेव्हिड वॉर्नरनं अभिनेत्री श्रीलीलासोबत डान्सही केलाय. सोहळ्यात त्यानं "नमस्कारम... गेल्या १५ वर्षांपासून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानू इच्छितो" असं म्हणतं त्याने पुन्हा चाहत्यांचं मन जिंकलं. 'रॉबिनहूड' हा चित्रपट चोरीच्या विषयावरील विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता नितीन आणि अभिनेत्री श्रीलीला मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 28 मार्च 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.