Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 10:26 AM2024-11-28T10:26:50+5:302024-11-28T10:27:04+5:30

ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटावर न्यायालयाने निर्णय दिला आहे.

Dhanush and Aishwarya Rajinikanth Are Now Officially Divorced after 18 Years of Marriage | Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता

Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता

Dhanush-Aishwarya Officially Divorced  : दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची लेक निर्माती ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाला न्यायालयाने मान्यता दिली आहे. ऐश्वर्या आणि धनुष यांनी 2022 मध्ये विभक्त होणार असल्याची माहिती दिली होती. अखेर आता लग्नाच्या 20 वर्षानंतर कायदेशीररित्या दोघे विभक्त झाले आहेत. ऐश्वर्या आणि धनुष यांचा घटस्फोट 27 नोव्हेंबर 2024 रोजी चेन्नई कुटुंब कल्याण न्यायालयाने मंजूर केला आहे. 

धनुषने 2022 मध्ये आपला १८ वर्षांचा संसार मोडत, पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळं होण्याची घोषणा केली होती. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जावर कोर्टाकडून सुनावणी सुरू होती. यादरम्यान, रजनीकांत आणि कुटुंबीयांनी दोघांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या प्रयत्नला यश आलं नाही. अखेर या घटस्फोट प्रकरणावर न्यायाधीशांनी 27 नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्चित केली होती. यानंतर बुधवारी न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली. घटस्फोटाची घोषणा केल्यापासून अर्थात गेल्या 2 वर्षांपासून धनुष आणि ऐश्वर्या दोघंही वेगळे राहत होते.

ऐश्वर्या आणि धनुष यांचं २००४ मध्ये झालं होतं. त्यांना यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं आहेत. त्यामुळे घटस्फोटानंतर मुलांची कस्टडी कोणाकडे जाणार याबाबतही कोर्टाने निर्णय दिला आहे.  वेगळे होत असलो तरी यात्रा आणि लिंगाचे पालकत्व दोघांकडेही राहणार आहे. ऐश्वर्या आणि धनुष यांचा घटस्फोट दाक्षिणात्य इंड्स्ट्रीतील सर्वात चर्चेतला घटस्फोट आहे.


Web Title: Dhanush and Aishwarya Rajinikanth Are Now Officially Divorced after 18 Years of Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.