सुपरस्टार धनुषच्या लेकाला सुपरबाईक चालवणं पडलं महागात, चेन्नई पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 01:05 PM2023-11-20T13:05:55+5:302023-11-20T13:06:54+5:30

अभिनेत्याचा मुलगा यात्रा अडचणीत सापडला.

Dhanush s son yatra raja fined by chennai police for riding superbike without helmet and licence | सुपरस्टार धनुषच्या लेकाला सुपरबाईक चालवणं पडलं महागात, चेन्नई पोलिसांनी केली कारवाई

सुपरस्टार धनुषच्या लेकाला सुपरबाईक चालवणं पडलं महागात, चेन्नई पोलिसांनी केली कारवाई

साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) सध्या ' कॅप्टन मिलर' सिनेमामुळे चर्चेत आहे. तसंच आगामी फिल्म्सचीही तो तयारी करत आहे. याशिवाय तो वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. नुकतंच अभिनेत्याचा मुलगा यात्रा अडचणीत सापडला. लायसन्स आणि हेल्मेटशिवाय सुपर बाईक चालवल्याने त्याला चेन्नईपोलिसांनी पकडले. यामुळे त्याचे चलानही कट केले गेले.

धनुषचा मोठा मुलगा यात्रा राजाला हेल्मेट आणि लायसन्सशिवाय सुपरबाईक चालवणं महागात पडलं. १७ वर्षीय यात्राकडे अधिकृत लायसन्स नव्हतं. तसंच त्याने हेल्मेटही घातलं नव्हतं. ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला १००० रुपयांचा दंड भरावा लागला. चेन्नईच्या पोएस गार्डन एरियात तो एका गाईडसोबत सुपरबाईक चालवत होता. त्याने केवळ मास्क घातला होता त्यामुळे त्याची आई् ऐश्वर्यानेच तो आपला मुलगा असल्याचं कन्फर्म केलं. 

यात्रा राजा हा धनुष आणि ऐश्वर्याचा मोठा मुलगा आहे. ऐश्वर्या ही रजनीकांत यांची लेक आहे. त्यांना लिंगा हा धाकटा मुलगा आहे. तो १३ वर्षांचा आहे. धनुष नेहमी त्याच्या मुलांसोबत वेळ घालवतानाचे फोटो व्हिडिओ शेअर करत असतो. 

धनुषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो अरुण मथेश्वरन दिग्दर्शित 'कॅप्टन मिलर' सिनेमात दिसणार आहे. मात्र सिनेमाची रिलीज डेट सतत पोस्टपोन होत आहे. शिवाय धनुषकडे इलैयाराजा ही बायोपिकही आहे.

Web Title: Dhanush s son yatra raja fined by chennai police for riding superbike without helmet and licence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.