'कल्की 2898 एडी' सिनेमाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार, निर्मात्यांकडून मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 12:42 PM2024-07-01T12:42:23+5:302024-07-01T12:59:24+5:30

सुपरस्टार प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Director Nag Ashwin Shares An Update On The Prabhas-Deepika Padukone Starrer Sequel | 'कल्की 2898 एडी' सिनेमाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार, निर्मात्यांकडून मोठी घोषणा

'कल्की 2898 एडी' सिनेमाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार, निर्मात्यांकडून मोठी घोषणा

सुपरस्टार अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'कल्कि 2898 एडी' हा बिग बजेट सिनेमा २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. नाग अश्विन दिग्दर्शित हा साय-फाय चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करणारा 'कल्कि 2898 एडी' सिनेमा जवळपास 500 कोटींच्या घरात पोहचला आहे. आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसऱ्या भागात प्रभासपेक्षा एका दुसऱ्या अभिनेत्याची भुमिका मोठी असणार आहे.

सुपरस्टार प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. 'कल्कि 2898 एडी' सिनेमाचा दुसरा भाग येणार हे, निर्मात्यांनी सांगितले आहे. मात्र, नक्की सिनेमा कधी प्रदर्शित होणार, याचा खुलासा हा निर्मात्यांनी केला नव्हता. हिंदुस्तान टाईम्सनुसार, नाग अश्विनने लाईव्ह चॅट दरम्यान चाहत्यांना सांगितलं की, 'कल्कि 2898 एडी' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा दुसरा भाग थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी तीन वर्षे लागतील. सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं जवळजवळ 60 टक्के काम पूर्ण झाले आहे'.

'कल्कि 2898 एडी' मध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कमल हसन यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, चित्रपटाच्या दुसऱ्या भागात त्यांची भूमिका मोठी असणार आहे. काही काळापासून फ्लॉपचा सामना करणाऱ्या प्रभाससाठी हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. 'कल्कि 2898 एडी' हा सिनेमा एका महाकाव्यावर हा सिनेमा आधारित आहे. 

Web Title: Director Nag Ashwin Shares An Update On The Prabhas-Deepika Padukone Starrer Sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.