मल्याळम इंडस्ट्री पुन्हा हादरली! साई पल्लवीच्या हिरोवर लैंगिक शोषणाचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 01:32 PM2024-09-04T13:32:45+5:302024-09-04T13:37:07+5:30

मल्याळम इंडस्ट्रीला सध्या एकामागून एक हादरे बसत असून नुकतंच इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्यावर शारीरिक शोषणाचे आरोप लागले आहेत

famous Malayalam actor nivin pauly allegations of physical abuse against women | मल्याळम इंडस्ट्री पुन्हा हादरली! साई पल्लवीच्या हिरोवर लैंगिक शोषणाचे आरोप

मल्याळम इंडस्ट्री पुन्हा हादरली! साई पल्लवीच्या हिरोवर लैंगिक शोषणाचे आरोप

सध्या मल्याळम इंडस्ट्रीमध्ये विविध कारणांनी धक्कादायक घटना घडत आहेत. मल्याळम इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्यांवर सध्या लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत. अशातच मल्याळम इंडस्ट्रीमधून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मल्याळम इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता निविन पॉलीवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. निविन हा लोकप्रिय अभिनेता असून त्याचा साई पल्लवीसोबतचा 'प्रेमम' सिनेमा प्रचंड गाजलाय. हे आरोप लागल्यावर निविनने स्पष्टीकरण दिलंय.

निविनवर लैंगिक शोषणाचे आरोप, अभिनेता म्हणाला...

'बेंगलोर डेज', 'प्रेमम' अशा लोकप्रिय सिनेमा गाजवलेला मल्याळम इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे निविन पॉली. रिपोर्ट्सनुसार, एका महिलेला सिनेमात काम देण्याच्या नावाखाली निविनने तिचं शारीरिक शोषण केलं असल्याचा आरोप आहे. यामुळे निविनविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. ही बातमी बाहेर येताच निविनने मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून स्वतःच्या हक्कासाठी कोर्टाची पायरी चढण्याची तयारी दाखवली आहे.


 


आरोप लागताच निविन पॉली काय म्हणाला?

लैंगिक शोषण झाल्याने एका ४० वर्षीय महिलेने निविन आणि अन्य ६ लोकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. निविनने यासंबंधी पत्रकार परिषद आयोजित करुन खुलासा केला की, "मी त्या महिलेला ओळखत नाही. मी कधी तिला भेटलो नाही, तिच्याशी बोललो नाही. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसून मी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो" असं स्पष्टीकरण निविनने दिलंय. आता या प्रकरणाला आणखी कोणतं वळण मिळणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title: famous Malayalam actor nivin pauly allegations of physical abuse against women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.