प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते ज्युनिएर बलैया यांचं निधन, घरात गुदमरून झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 09:21 AM2023-11-03T09:21:53+5:302023-11-03T09:30:32+5:30
त्यांच्या निधनाने तमिळ सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीला प्रसिद्ध अभिनेता रघु बलैया उर्फ ज्युनियर बलैया यांचा मृत्यू झाला आहे. ते 70 वर्षांचे होते. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले ज्युनियर बलैया यांचं चेन्नई येथील राहत्या घरी गुदमरून झाल्याचे सांगण्यात आले आहे. . त्यांच्या निधनाने तमिळ सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
रिपोर्टनुसार, चेन्नईमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. २०१२ मध्ये आलेल्या ‘सत्ताई’ चित्रपटातील मुख्याध्यापकाच्या भूमिकेमुळे त्यांना खरी लोकप्रियता मिळाली.
ज्युनियर बलैया यांचं पूर्ण नाव रघु बलैया होते. 28 जून 1953 रोजी जन्मलेल्या ज्युनियर बलय्या यांनी चित्रपटांपूर्वी थिएटर आर्टिस्ट म्हणूनही काम केले होते. शिवकुमार स्टारर 'मेलानट्टू मारुमल' या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. सहाय्यक अभिनेता म्हणून त्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. शिवाजी गणेशनसोबत 'त्यागम' आणि 'हवबे मायाम'मध्ये कमल हसनच्या मित्राची भूमिका साकारूनही त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकले.
चित्रपटांव्यतिरिक्त, ज्युनियर बलैयाने अनेक टेलिव्हिजन शोमध्येही काम केले. यामध्ये 'चिठी', 'वाजकाई' आणि 'चिन्ना पापा पेरिया पापा' यांचा समावेश आहे. 2019 मध्ये, ते अजित कुमारच्या 'नेरकोंडा परवाई'मध्ये दिसले होते, जो 'पिंक'चा तामिळ रिमेक आहे. ज्युनियर बलैया शेवटचे पडद्यावर 'येनंगा सर उंगा सट्टम' चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता.