'कल्कि २'साठी चाहत्यांना करावी लागणार मोठी प्रतीक्षा, जाणून घ्या यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:48 IST2024-12-30T15:48:05+5:302024-12-30T15:48:55+5:30

Kalki 2898 AD Movie : प्रभास आणि अमिताभ बच्चन यांचा चित्रपट 'कल्की 2898 एडी' या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट ठरला. त्याच्या यशानंतर चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी चाहत्यांना बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे.

Fans will have to wait a long time for 'Kalki 2', know the reason behind this | 'कल्कि २'साठी चाहत्यांना करावी लागणार मोठी प्रतीक्षा, जाणून घ्या यामागचं कारण

'कल्कि २'साठी चाहत्यांना करावी लागणार मोठी प्रतीक्षा, जाणून घ्या यामागचं कारण

यावर्षी अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी एक म्हणजे 'बाहुबली' अभिनेता प्रभास (Prabhas) आणि मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा चित्रपट 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD Movie). नाग अश्विन (Nag Ashwin) दिग्दर्शित या ६०० कोटी रुपयांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०४० ते १२०० कोटी रुपयांची कमाई केली आणि या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट ठरला. त्याच्या यशानंतर चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी चाहत्यांना बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे. 

'कल्की 2898 एडी' सिनेमाच्या सीक्वलसाठी २०२५च्या उन्हाळ्यात त्याचे शूटिंग सुरू होणार होते, परंतु आता ते पुढे ढकलण्यात आले आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत दिसली होती, जिने या वर्षी मुलीला दुआला जन्म दिला आणि सध्या तिला तिचा सर्व वेळ आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी घालवायचा आहे. ज्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगला उशीर होऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी करता येत नाही.

शूटिंगला होतोय विलंब
खरेतर, नुकतेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलगी दुआसोबत पहिल्यांदाच मुंबईतील एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाले होते. रिपोर्ट्सनुसार, यावेळी एका मीडिया व्यक्तीने दीपिकाला 'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या पार्ट २ बद्दल प्रश्न विचारला, ज्याच्या उत्तरात दीपिकाने सांगितले की, सध्या तिचे पहिले प्राधान्य तिची मुलगी दुआ आहे. तिने सांगितले की, तिला कामावर परतण्याची घाई नाही. दीपिका म्हणाली, 'माझ्या आईने मला जसं वाढवलं आहे तसं मला माझ्या मुलीला वाढवायचं आहे.'

मुलगी दुआकडे पूर्ण लक्ष देते
दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी २०१८ मध्ये इटलीमध्ये एका मोठ्या कार्यक्रमात लग्न केले. लग्नाच्या ६ वर्षांनंतर, दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना यावर्षी त्यांच्या पहिल्या बाळाबद्दल आनंदाची बातमी दिली, त्यानंतर सप्टेंबरमध्ये दोघांनीही त्यांच्या मुलीचे स्वागत केले. दीपिका-रणवीरच्या मुलीचा जन्म ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाला. जिथे शाहरुख खानही तिला भेटायला गेला होता. सध्या ही अभिनेत्री तिच्या मुलीसोबत खास क्षण घालवत असून अलीकडेच ती दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली होती.

 

Web Title: Fans will have to wait a long time for 'Kalki 2', know the reason behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.