'गेम चेंजर'चं बजेट काय? राम चरणचं मान'धन' ऐकून हैराण व्हाल! तेवढ्या पैशात तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 15:44 IST2025-01-03T15:37:41+5:302025-01-03T15:44:05+5:30

'गेम चेंजर' हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे.

Game Changer Cast Fees Ram Charan To Kiara Advani Know How Much The Stars Charge | 'गेम चेंजर'चं बजेट काय? राम चरणचं मान'धन' ऐकून हैराण व्हाल! तेवढ्या पैशात तर....

'गेम चेंजर'चं बजेट काय? राम चरणचं मान'धन' ऐकून हैराण व्हाल! तेवढ्या पैशात तर....

Ram Charan - Kiara Advani: सुपरस्टार राम चरण सध्या 'गेम चेंजर' (Game Changer) या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'गेम चेंजर'  हा चित्रपट 2025 मधील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटाच्या स्टार कास्टसोबतच प्रेक्षकही याबद्दल खूप उत्सुक आहेत. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, ज्यामध्ये राम चरण आणि कियारा अडवाणीची स्टाईलह लोकांना खूप आवडली आहे.  10 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवेल अशी अपेक्षा आहे. या सिनेमासाठी राम चरण आणि कियारानं घेतलेल्या मानधनाची सध्या चर्चा रंगली आहे. 

'गेम चेंजर' हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये ॲक्शन सीन्स आणि ग्राफिक्सवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे सिनेमात अ‍ॅक्शनचा तडका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.  'गेम चेंजर'चं बजेट हे तब्बल जवळपास 450 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची गाणी तयार करण्यासाठी 75 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या सिनेमासाठी राम चरण याने भरपूर मेहनत घेतली आहे. 

ग्रेट आंध्रच्या रिपोर्टनुसार, 'गेम चेंजर' चित्रपटासाठी राम चरणने 65 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. खरं तर राम चरण हा याहीपेक्षा जास्त मानधन घेतो. पण,  'गेम चेंजर' चित्रपट मूळ डेडलाइन पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्यानं त्यानं मानधनात कपात केली. चित्रपटाच्या निर्मात्यासोबत झालेल्या करारानुसार त्यांनी हे पाऊल उचलले. राम चरणपेक्षा कियारा हिला खूपच कमी मानधन मिळालं आहे. तिला  5 ते 7 कोटी रुपये दिल्याचं समोर आलं आहे. राम चरण आणि कियारा यांची मोठ्या पडद्यावर केमिस्ट्री पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतो की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल. 

Web Title: Game Changer Cast Fees Ram Charan To Kiara Advani Know How Much The Stars Charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.