तेजा सज्जाचा 'हनुमान' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी कुठे पाहता येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 11:06 AM2024-02-11T11:06:24+5:302024-02-11T11:14:43+5:30

थिएटरमध्ये खळबळ माजवल्यानंतर आता चाहते या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत

Hanuman OTT Release Date Out : Teja Sajja-starrer 'Hanuman' will release on Zee5 on 2 March 2024 | तेजा सज्जाचा 'हनुमान' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी कुठे पाहता येईल

तेजा सज्जाचा 'हनुमान' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी कुठे पाहता येईल

सध्या बॉक्स ऑफिसवर आणि कलाविश्वात एकाच सिनेमाची चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे 'हनुमान' (HanuMan). तेजा सज्जा (Teja Sajja) याची मुख्य भूमिका असलेल्या या तेलुगू सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धूम ठोकली असून जबरदस्त कमाई केली आहे. हा सिनेमा सगळ्याच बाजूने परफेक्ट ठरला आहे. थिएटरमध्ये खळबळ माजवल्यानंतर आता चाहते या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत, ज्याबद्दल एक मोठं अपडेट समोर आलं आहे. 

गेल्या महिन्यात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजेच १२ जानेवारीला दिग्दर्शक प्रशांत वर्माचा 'हनुमान'  हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.  पण आता लवकरच हा चित्रपट  2 मार्च 2024 रोजी ओटीटीवर उपलब्ध होणार आहे. हनुमानच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ला विकले आहेत. त्यामुळे चाहते हा सिनेमा 2 मार्चनंतर ZEE5 वर पाहू शकतात. 

अंजनदारी या काल्पनिक गावावर आधारित हा सिनेमा असून सुपरहिरोच्या रुपातला तेजा सज्जा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्राइम शो एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होत आहे. तेजा सज्जा मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमात वारालक्ष्मी सरतकुमार, विनय राय आणि अमृता अय्यर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे हुनमान सिनेमाच्या प्रत्येक तिकीटातले पाच रुपये निर्मात्यांनी राम मंदिरासाठी दिले आहेत. यावरुन सिनेमाच्या टीमचं जोरदार कौतुक होत आहे. 
 

Web Title: Hanuman OTT Release Date Out : Teja Sajja-starrer 'Hanuman' will release on Zee5 on 2 March 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.