अभिनेत्री नव्हे तर राशी खन्नाला व्हायचं होतं IAS ऑफिसर, पण…
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 13:42 IST2023-11-30T13:34:55+5:302023-11-30T13:42:57+5:30
सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी राशी खन्ना आज 33 वा वाढदिवस साजरा करत आहे.

अभिनेत्री नव्हे तर राशी खन्नाला व्हायचं होतं IAS ऑफिसर, पण…
राशी खन्ना ही आजच्या पिढीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री. सौंदर्य आणि उत्कृ्ष्ट अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी राशी खन्ना आज 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. मोठं होऊन अभिनेत्री व्हावं असं तिचं कधीही स्वप्न नव्हतं. तिला IAS ऑफिसर व्हायचं होतं.
राशी खन्नाचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी झाला. राशीचा जन्म आणि बालपण दिल्लीमध्ये गेलं. राशीचं शालेय आणि उच्च शिक्षणही दिल्लीमध्ये पूर्ण झालं आहे. अभ्यासात चांगली असल्याने आपण आयएएस अधिकारी व्हावं अशी तिची इच्छा होती. जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवलं तेथूनच ती अभिनयाकडे वळाली.
राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली. राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. बंगाल टायगर, सुप्रीम आणि जय लवा कुसा यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे.
आजतागायत अनेक चित्रपटांमधून राशीने आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. आपल्या फिल्मी करीअर आणि पर्सनल लाईफमुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिली. राशी खन्ना चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम करून चांगली कमाई करते. राशी खन्ना यांचे हैदराबादमध्ये स्वतःचे अतिशय आलिशान घर आहे. या घराशिवाय अभिनेत्रीचा हरियाणात एक छान बंगलाही आहे. राशी खन्नाच्या घरांची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगितले जाते.