"मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपड बदलत होती आणि तो...", 'कबीर सिंग' अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:45 IST2025-04-02T11:43:54+5:302025-04-02T11:45:32+5:30

Shalini Pandey : अभिनेत्री शालिनी पांडे हिने अलीकडेच तिच्या सिनेइंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात आलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दल खुलासा केला आहे.

''I was changing clothes in the vanity van and he...'', shocking revelation of 'Kabir Singh' actress Shalini Pandey | "मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपड बदलत होती आणि तो...", 'कबीर सिंग' अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

"मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपड बदलत होती आणि तो...", 'कबीर सिंग' अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री शालिनी पांडे (Shalini Pandey) हिने अलीकडेच तिच्या सिनेइंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात आलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने एका प्रसंगाचा उल्लेख केला, ज्यात एक साउथचा दिग्दर्शक तिच्या व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा न ठोकता आत घुसला होता आणि त्यादरम्यान ती कपडे बदलत होती. धक्कादायक घटनेची आठवण करून देताना, अभिनेत्री म्हणाली की तिने स्वतःचे रक्षण करण्यासाठी सुरुवातीच्या काळात कठोर सीमा निश्चित केल्या होत्या.

फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत शालिनीने इंडस्ट्रीतील पुरुषांसोबत काम करतानाचे अनुभव सांगितले आणि ती म्हणाली की, 'मी फक्त चांगल्या पुरुषांसोबतच काम केले आहे असे नाही. मी ऑनस्क्रीन, ऑफस्क्रीन आणि क्रूसह काही भयानक पुरुषांसोबतही काम केले आहे. आपल्याला फक्त सीमा निश्चित कराव्या लागतील. मी अत्यंत अराजकवादी पुरुषांचाही सामना केला आहे. हे सत्य आहे.

अभिनेत्रीला नाही फिल्मी पार्श्वभूमी 
चित्रपटसृष्टीतील एक बाहेरची व्यक्ती असल्याने, अभिनेत्रीने आठवण करून दिली की अशा परिस्थितीचा सामना करताना तिला कसे मार्गदर्शन नव्हते. अभिनेत्री म्हणते, 'मी सिने कुटुंबातील नाही, त्यामुळे सुरुवातीला मला गोष्टी कशा हाताळायच्या हे माहित नव्हते. मी पूर्णपणे एकटी होती आणि सल्ला घेण्यासाठी कोणीही नव्हते. पण मागे वळून पाहताना मला आनंद होतो की मी तशी होते. कदाचित मी भोळी होते, पण मला कठोर सीमा होत्या. जेव्हा गरज असते तेव्हा मला राग येतो.

नवोदित अभिनेत्रींना दिला जातो हा सल्ला 
शालिनी पांडेने खुलासा केला की, ती कपडे बदलत असताना साउथच्या दिग्दर्शकाने न विचारता थेट तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये प्रवेश केला. ही अस्वस्थ करणारी घटना शेअर करताना शालिनी म्हणाली, 'माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी साउथ चित्रपटात काम करत असताना एकदा व्हॅनिटी व्हॅनमध्ये मी कपडे बदलत असताना अचानक दिग्दर्शक दरवाजा न ठोकता आत घुसला. मी एक नवोदित अभिनेत्री होते. म्हणून लोक मला गोड बोलायला सांगत होते आणि कोणाला त्रास देऊ नकोस, नाहीतर तुला काम मिळणार नाही. असे सर्व मी ऐकले.

त्या घटनेतून मिळाला धडा
त्या घटनेचा संदर्भ देत शालिनी पांडे म्हणाली की, 'मला वाटलंही नव्हतं... मी फक्त किंचाळले. मी माझा संयम पूर्णपणे गमावला होता. मी २२ वर्षांचे होते. नंतर लोकांनी मला सांगितले की मी अशी प्रतिक्रिया द्यायला नाही पाहिजे. पण शिष्टाचार कुठे आहे? फक्त मी नवीन आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही दरवाजा वाजवल्याशिवाय आत जाऊ शकता. त्या क्षणाने मला जाणीव करून दिली की मला स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे, जरी त्या लोकांना माझ्या वृत्तीमध्ये काही समस्या वाटली असेल.' अभिनेत्री पुढे म्हणते, 'रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी या गोष्टींना कसे सामोरे जायचे ते मला नंतर समजले.'

वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, शालिनी पांडे शेवटची आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत महाराज सिनेमात आणि नेटफ्लिक्सवरील सीरिज डब्बा कार्टेलमध्ये दिसली होती. ती आता धनुष दिग्दर्शित इडली कढईमध्ये झळकण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: ''I was changing clothes in the vanity van and he...'', shocking revelation of 'Kabir Singh' actress Shalini Pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.