'देवरा' सिनेमा पाहताना चित्रपटगृहात चाहत्याचा अचानक मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:49 PM2024-09-30T12:49:27+5:302024-09-30T12:50:41+5:30
'देवरा' सिनेमा पाहताना थिएटरमध्येच ज्युनियर एनटीआरच्या एका चाहत्याचा मृत्यू झाला आहे.
Junior NTR Fan Dies While Watching Devara: साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या त्यांच्या आगामी 'देवरा' (Devara Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा २७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. एकीकडे 'देवरा'चे कौतुक होतोय, तर दुसरीकडे एक वाईट बातमी समोर येत आहे. 'देवरा' सिनेमा पाहताना थिएटरमध्येच ज्युनियर एनटीआरच्या एका चाहत्याचा मृत्यू झाला आहे.
ज्युनियर एनटीआरचा एक तगडा फॅन 'देवरा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेला होता. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, तो स्क्रिनिंगदरम्यान प्रत्येक सीनवर टाळ्या वाजवत होता. अगदी आनंदात तो चित्रपट पाहत होता. पण, अचानक चित्रपट पाहताना त्या चाहत्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले.
आंध्र प्रदेशातील कडप्पा येथील ही घटना आहे. 'देवरा' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या त्या चाहत्यांचं नाव मस्तान असं आहे. या घटनेनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चित्रपटगृहात प्रेक्षक आणि पोलीस दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
దేవర సినిమా చూస్తూ ఒక్కసారిగా కుప్పకూలి అభిమాని మృతి
— IMǍMẞÝEÐ✨ (@IMAMSYED0) September 27, 2024
కడప - అప్సర థియేటర్లో సినిమా చూస్తూ కేకలు వేస్తూ ఒక్కసారిగా కుప్పకూలిన మస్తాన్వలీ అనే అభిమాని.
వెంటనే ప్రైవేట్ ఆస్పత్రికి తరలించగా అప్పటికే మృతి.#DEVARA#DevaraStorm#DevaraCelebrations#NTR𓃵#Ntrfanspic.twitter.com/UmlcRilt3Y
अभिनेता सैफ अली खान 'देवरा'मध्ये खलनायक आहे. या चित्रपटातही सैफ भैरवच्या भूमिकेत एनटीआरला टक्कर देताना दिसतोय. तर अभिनेत्री जान्हवी कपूरने 'देवरा'मध्ये पहिल्यांदा ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर केली आहे. यासोबतच मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेदेखील या सिनेमात पाहायला मिळाली आहे. तिने 'देवरा' सिनेमात मुख्य भूमिका साकारलीय.