अमिताभ बच्चन यांनी का मागितली हात जोडून प्रभासच्या चाहत्यांची माफी ? म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 12:36 PM2024-06-24T12:36:34+5:302024-06-24T12:51:09+5:30

हा चित्रपट या महिन्यात 27 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Kalki 2898 AD: Amitabh Bachchan Apologises To Prabhas’ Fans With Folded Hands | अमिताभ बच्चन यांनी का मागितली हात जोडून प्रभासच्या चाहत्यांची माफी ? म्हणाले...

अमिताभ बच्चन यांनी का मागितली हात जोडून प्रभासच्या चाहत्यांची माफी ? म्हणाले...

'कल्की 2898 एडी' हा यंदाच्या वर्षीच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.या चित्रपटाबद्दल सध्या प्रेक्षकांच्या मनात प्रचंड आतुरता निर्माण झाली आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण अशी तगडी स्टारकास्ट या एकाच सिनेमात झळकली आहे. नुकताच या चित्रपटाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अमिताभ बच्चन यांनी सहकलाकार प्रभासच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. 

'कल्की 2898 एडी'ची रिलीज डेट जवळ आली आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण आणि कमल हासन, निर्माते प्रियांका दत्त आणि स्वप्ना दत्त यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली आणि त्यांच्या चित्रपटाशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या. यावेळी अमिताभ बच्चन यांनी हात जोडून प्रभासच्या चाहत्यांची माफी मागितली. ते म्हणाले, 'सिनेमात मी जे काही करतोय ते पाहून माझा राग धरु नका. मी हात जोडून प्रभासच्या सर्व चाहत्यांची माफी मागतो'. 

नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी'  हा एक ॲक्शन थ्रिलर साय-फाय चित्रपट आहे. भैरवची भूमिका साकारणारा प्रभास डॅशिंग अवतारात पाहायला मिळणार आहे. तर कमल हसन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलं असून, अश्विनी दत्त यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 81 वर्षीय अमिताभ बच्चन कल्की 2898 मध्ये अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'कल्की 2898 एडी' बनवण्यासाठी 600 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याचबरोबर चित्रपटाच्या सेट आणि व्हीएफएक्सवरही मोठी रक्कम खर्च करण्यात आली आहे. हा चित्रपट या महिन्यात 27 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Web Title: Kalki 2898 AD: Amitabh Bachchan Apologises To Prabhas’ Fans With Folded Hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.