Kalki 2898 AD : दीपिका-प्रभासच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सीक्वल येणार? महत्वाची अपडेट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:21 IST2025-03-19T13:17:57+5:302025-03-19T13:21:39+5:30
'कल्कि एडी: २८९८' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

Kalki 2898 AD : दीपिका-प्रभासच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सीक्वल येणार? महत्वाची अपडेट समोर
Kalki 2898 AD Sequal: अभिनेते अमिताभ बच्चन, (Amitabh Bachchan) कमल हसन, दीपिका पादुकोण (Dipika Padukone) आणि प्रभास (Prabhas) यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'कल्कि एडी: २८९८' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की : २८९८ एडी' या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. २७ जून २०२४ ला हा सिनेमा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. एका महाकाव्यावर हा सिनेमा आधारित आहे. अशातच आता या ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
जवळपास वर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या सुपरहिट चित्रपटच्या सीक्वेलची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केली आहे. गेल्या काही काळापासून या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत चर्चा सुरू होती. आता 'कल्की : २८९८ एडी' चित्रपटाचं पटकथालेखन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक नाग अश्विन माध्यमांसोबत संवाद साधताना चित्रपटाच्या सीक्वलबाबत हिंट दिली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 'कल्की : २८९८ एडी' च्या घवघवीत यशानंतर आता चित्रपटाच्या सीक्वलबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रभासबद्दल काय म्हणाले...
'कल्की : २८९८ एडी' चे दिग्दर्शक नागा अश्विन यांनी दुसऱ्या भागात प्रभास असणार की नाही यासंदर्भात देखील महत्वाची अपडेट दिली आहे. माध्यमांसोबत संवाद साधताना नाग अश्विन यांनी दुसऱ्या पार्टमध्ये प्रभासचा स्क्रीन टाईम जास्त असणार आहे, असं सांगितलं आहे. त्यामुळे प्रभासचे चाहते सुखावले आहेत.
दरम्यान, चित्रपटात अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, तसंच अभिनेते कमल हासन असणार की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.